नांदेड : दिल्ली येथील कार्यक्रमात ११ जणांचा सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |

tabligi_1  H x
 
 
 
नांदेड : दिल्ली निझामुद्दीन येथे नांदेड मधील ११ जणांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दिल्ली पोलिसांकडून नांदेड पोलिसांना कळविण्यात आले होते. त्यासंबंधी शोध घेतल्यावर ८ जणांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच त्यातील दोघे परजिल्ह्यात असल्याची माहिती मिळत असून दरम्यान , पोलिसांना आणखी १६ जणांची नावे मिळाली असल्याची देखील माहिती समोर येत आहे. नव्याने यादी आलेल्यांचा पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे ११ पैकी बहुतांश जण हे शहरातील विविध भागातील रहिवासी आहेत.
 
 
पोलीस अधीक्षक कार्यालयातून या सर्वांना अगोदर फोनवर संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यातील आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत नांदेडात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णन आढळल्याने सुटकेचा नि : श्वास सोडणाऱ्या यंत्रणेची या प्रकारामुळे झोप उडाली असून या भाविकांचा आता शोध घेण्यात येत आहे .
 
 
मोबाईलच्या लोकेशनवरुन घेतला शोध दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळ आणि आजूबाजूच्या परिसरात त्यावेळी सुरु असलेल्या मोबाईलच्या टॉवर लोकेशनवरुन या सर्व भाविकांचा शोध घेण्यात येत आहे नांदेडातील एक जणाचा मृत्यू झाला असून त्याचा मोबाईल दुसराच कुणीतरी वापरत असल्याचे देखील समोर आले आहे. ज्या भाविकांचे मोबाईल त्या ठिकाणी सुरु होते . त्यांचीच नावे कळत आहेत परंतु मोबाईलच वापरत नसलेल्या भाविकांचा शोध कसा घेणारा हा मोठा प्रश्न आहे . तर नव्याने यादी मिळालेल्यांपैकी किती जणांचे फोन सुरु आहेत किंवा नाही. तसेच ते पोलिसांना कसा प्रतिसाद देणार हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
लातूर मध्ये दिल्लीवारी केलेला कोणीही नाही
 
लातूर जिल्ह्यातील उदगीर मधील एक तरुण दिल्ली वारी करून आल्याची चर्चा होती. मात्र तो तरुण जरी दिल्ली वारी करून आला असला तरी, तो निझामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी नव्हता. तसेच त्याची आरोग्य तपासणी केली असता त्याच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ राजेंद्र माने तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय ढगे यांनी दिली. तसेच, लातूर जिल्ह्यात दिल्ली संदर्भाने कोणीही नाही देखील त्यांनी यावेळी सांगितले. डॉ ढगे म्हणाले , सदर व्यक्ती १५ दिवसापूर्वी दिल्ली येथून प्रवास करून आला , मात्र त्याचा तेथील कार्यक्रमात सहभाग नव्हता . त्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दुजोरा दिला . आपल्या जिल्ह्यात एकही दिल्ली कनेक्शन संबंधाने रुग्ण नाही . मात्र आपण प्रत्येक शक्यता पडताळून पाहत आहोत . कोणतीही उणीव राहू नये म्हणून अधिकाधिक तपासणी व प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करत आहोत . मात्र चुकीची माहिती देऊन प्रशासन व यंत्रणेची धावपळ करू नये असे आवाहन करण्यात आले . दरम्यान पुढील काही दिवस घराबाहेर पडू नका , सहकार्य करावे असेही कळविण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@