धुळ्यात लपून बसलेल्या चार तब्लीगींना घेतले ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |
dhule_1  H x W:
 
 

पोलीसांनी तब्लीगींच्या मुसक्या आवळल्या

धुळे  (विशेष प्रतिनिधी) : दिल्ली येथे तब्लीग- ए-जमात च्या कार्यक्रमात सहभागी होऊन देशभरात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण करणारे तब्लीग आता धुळ्यातही आढळून आले आहेत. पोलीसांनी गुरूवारी मोगलाई परिसरातून चार मुस्लिमांना ताब्यात घेतले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तीनजण धुळे शहरातील तर एक जण तालुक्यातील रहिवासी आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात अद्यापपर्यंत तब्लीग- ए-जमात कार्यक्रमात सहभागी झालेला एकही व्यक्ती आढळून आलेला नाही.
 
 
 
तब्लीग- ए-जमातच्या कार्यक्रमात धुळ्यातील चार जण गेले होते. मात्र, त्यांनी पुढे येऊन तपासणी करण्यास अथवा प्रशासनास त्याची माहिती दिली नाही. ते चार लोक धुळे शहरातील मोगलाई परिसरातील एका तीन मजली इमारतीत लपून बसले असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी प्रथम मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत मंडळींची मदत घेऊन त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी अखेर घटनास्थळी जास्तीची कुमक मागविली आणि त्या चार जणांना ताब्यात घेतले. यावेळी चौघांपैकी तीन जण इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अंगावर चादर घेऊन लपले होते. चारपैकी दोन जण अल्पवयीन आहेत, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
 
 
 
धुळ्यात धर्मप्रचारासाठी तब्बल ५० तब्लीगी दाखल झाल्याची धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे अद्यापतरी आढळून आलेली नाहीत, मात्र आता प्रशासनाने त्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मंडळी फेब्रुवारीपासूनच धुळ्यात दाखल झाली आहेत. त्यामध्ये नेपाळ व मुंबईतील प्रत्येकी ११ आणि उर्वरित जण हे दक्षिण भारतातील आहेत.
@@AUTHORINFO_V1@@