धारावीतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू ; सफाई कर्मचाऱ्याला कोरोना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |

dharavi_1  H x
मुंबई : मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची सख्या वाढत आहे. अशामध्ये हा कोरोना संसर्ग जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये पसरला आहे. २३ मार्च रोजी या धारावीमध्ये एकाला कोरोना झाल्याची माहिती बुधवारी देण्यात आली होती. मात्र, ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. तर, धारावीमध्ये सफाई कर्मचाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.
 
 
५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला कोरोना
 
 
 
महापालिकेच्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी आहे. धारावीत त्याला तैनात करण्यात आले होते. करोनाची लक्षणं आढळल्याने अधिकाऱ्यांना त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते. यावेळी त्याला करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे.
@@AUTHORINFO_V1@@