अवघ्या ५ मिनिटात होणार कोरोनाची चाचणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |

corona_1  H x W
मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारकडून रॅपिड टेस्टसाठी परवानगी मिळाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला रॅपिड टेस्टसाठी परवानगी दिली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “टेस्टिंग वाढवले पाहिजे अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पाच हजार चाचण्या करण्याची आपल्या राज्याची क्षमता आहे. आपल्याला याआधी रॅपिट टेस्टसाठी परवानगी मिळाली नव्हती. मात्र आता ती मिळाली आहे. रॅपिड टेस्टच्या माध्यमातून प्राथमिक चाचणी म्हणजेच स्क्रिनिंग केल्याने एखाद्याला करोनाची लागण झाली आहे की नाही हे पाच मिनिटात कळणार. करोनाची लागण झाली आहे का हे रक्ताचा नमुना घेतल्यानंतर पाच मिनिटांत स्पष्ट होईल. शरिरात तयार झालेल्या रोगप्रतिकारकांच्या प्रमाणावरुन हे निश्चित केले जाईल”. राज्य शासनाकडून त्यासंबंधी कारवाई केली जाईल. यावरुन आपल्याला करोनाची लागण झालेल्यांच्या संख्येचा अंदाज आला तर त्यांना तात्काळ या व्यक्तीचे विलगीकरण करत उपचार केले जातील अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.


प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कोरोना रुग्णालय
“प्रत्येक जिल्ह्यात करोनासाठी स्वतंत्र रुग्णालय देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याची अमबजावणीदेखील सुरु आहे. फक्त करोना रुग्णांसाठी वेगळी रुग्णालयं असावीत असा आग्रह केंद्र सरकारने, नरेंद्र मोदींनी धरला आहे. त्याप्रमाणे आपण आधीच तयारी केली आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@