निझामुद्दीन कार्यक्रमात सोलापुरातील १७ जणांचा सहभाग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |

solapur_1  H x
 

तबलिगी समाजातील १७ जणांपैकी ११ रुग्णालयात ६ अद्याप बेपत्ता 

सोलापूर : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून देशासोबतच राज्यानेदेखील सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतरही दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अंदाजे ९ हजार मुस्लिमांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी सोलापूरमधून १७ जण गेले होते. यातील ११ जणांना रुग्णालयामध्ये भरती केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
 
 
दिल्ली येथील निजामुद्दीन येथील कार्यक्रमामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील १७ जण सहभागी झाल्याची माहिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. या यादीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने १७ पैकी ११ जणांना ताब्यात घेतले. पुढे त्यांना उपचारासाठी कोरोना विलगीकरण कक्षात दाखल केले. उर्वरित ६ जण हे जिल्ह्यामध्ये आलेच नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@