संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातच साधू-संत सुरक्षित नाहीत ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020
Total Views |
Palghar Viral Video_1&nbs





पालघर : चोर समजून मारहाण करण्यात आलेल्या तीन प्रवाशांच्या मारहाणीचा व्हीडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. एक ड्रायव्हर आणि दोन साधूंना शंभर एक लोकांनी जीवे मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये घडली होती. पोलीसांनी कारवाई करत याविरोधात गुन्हा दाखल केला मात्र, आता ज्याप्रकारे या साधूंना अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. मॉब लिंचिंगच्या प्रकारावर पुरस्कारवापसी गँगवाले गप्प का?, महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का ?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात हिंदूंची अशीच अवस्था होणार आहे का ?, लॉकडाऊनच्या काळात या ठिकाणी इतका जमाव एकत्र कसा आला?, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहेत.
 


 
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारने या घटनेची सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मॉब लिंचिंगची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. पोलीसांसमोरच पीडिताला मारहाण होते, पोलीस उपस्थित असताना जमाव त्यांचा जीव घेतो, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का ?, या मागे कुणाचा हात आहे का पोलीसांवर दबाव आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.



 
 
 
 
विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही कडक शब्दांत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे! पालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे! या घटनेची नैतिक जवाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.



 
 
 
 
लॉकडाऊनच्या काळात दोनशे लोक लाठ्याकाठ्या एकत्र घेऊन जमतात अशावेळी पोलीस प्रशासन काय करत होते. ते चोर होते असे कोणी सांगितले, त्यांनी कोणाचे पैसे चोरले ?, एवढा प्रकार घडलाच कसा, असा प्रश्न प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी विचारला आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही या प्रकरणी सवाल विचारला आहे. हिंदू महाराष्ट्रात सुरक्षित आहेत का ?, महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होत आहे का ?, असा आक्रमक सवाल त्यांनी विचारला आहे.
 
 
 
 
पुरस्कारवापसीवाले चिडीचूप ?
 
 
मॉब लिंचिंगवरून सरकारला उठ सुट प्रश्न विचारणारे, देशात असुरक्षितता आहे, अशी वक्तव्य करणारे पुरस्कारवापसी वाले कुठे गेले. त्यांनी हा व्हीडिओ पाहिला नाही का ?, मॉब लिंचिंगच्या या प्रकाराबद्दल त्यांना काहीच बोलायचे नाही का, असा सवाल आता ट्विटरच्या माध्यमातून विचारला जात आहे. रविवारी दुपारपासून हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर #Palghar, #moblynching, #JusticeForHinduSadhus, #UddhavWorstCMEver, #Police, #Shame, #MaharashtraLynching, या हॅशटॅग्सच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारण्यात आले.
 


 
 



 
@@AUTHORINFO_V1@@