होय! मरकजमुळे दिल्लीत पसरला कोरोना : अरविंद केजरीवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020
Total Views |
Aravind Kejariwal_1 



दिल्लीत लॉकडाऊनच्या अटी शिथिल नाहीत

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीतील रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. निझामुद्दीन स्थित मरकजमध्ये झालेल्या तबलिघींच्या कार्यक्रमामुळेच कोरोना दिल्लीत सर्वात जास्त पसरला, असेही ते म्हणाले. दिल्लीत देशभरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी १२ टक्के रुग्ण आहेत. शनिवारी दिल्लीत ७३६ कोरोनाची लक्षणे आढळलेल्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १८६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. त्यापैकी एकूण २५ टक्के हे गंभीर रुग्ण आहेत. कोरोना संक्रमण त्यांना समजले नाही.
 
 
 
केजरीवाल म्हणाले, "कोरोनाच्या दहशतीत घाबरून जाता कामा नये. असेही लोक आहेत त्यांना विषाणूचे कोणतेही लक्षण आढळत नाही मात्र, त्यांना कोरोना असण्याची दाट शक्यता आहे. ही स्थिती चिंताजनक आहे. यामुळे लॉकडाऊनला कुठलीही सुट दिली जाणार नाही. एका आठवड्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. जी परिस्थिती असेल त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. केंद्राने लॉकडाऊन २ जाहीर केल्यानंतर २० एप्रिलपासून काही सेवांना सवलत दिली आहे. काही राज्यांच्या तुलनेत कार्यवारी सुरू झाली आहे. मात्र, राजधानी दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केला जाऊ शकत नाही."
 
 
 
केंद्राच्या निर्देशानुार अनेक अत्यावश्यक सेवेतील उत्पादन व सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, राजधानी दिल्लीत अद्याप यावर निर्णय घेण्यात येणार नाही. दिल्लीत एकूण १८९३ रुग्णसंख्या झाली असून ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@