नवभक्तांचे चिंतन-चिंता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020   
Total Views |


uddhav thackeray_1 &



बरे तर बरे माझी बाजू मांडणारे आणि मला पूजणारे आता नवभक्त महाराष्ट्रात तयार झालेत. आता कोरोनामधून सावरण्यासाठी मीच काय ती उपाययोजना करू शकतो, याचा त्यांना भयंकर विश्वास आहे. कारण, त्यांना सत्तेवर बसवण्यामध्ये आमच्या ‘हाता’चा तर ‘हात’ आहे. नाहीतर आज त्यांना महाराष्ट्रात ‘कमळ’वाल्यांचा छोटा भाऊ बनून राहावे लागले असते. 



‘लॉकडाऊन हे ‘पॉझ’ बटण आहे,’ असे सांगून कोरोनामुळे पुढे काय काय होईल हे मी सगळे सांगितले. यावर आमचे मांडलिक इतके खूश झाले की विचारू नका. त्यांनी लगेच जाहीर केले की, मोदीकाकांनी माझ्याशी कोरोनाशी लढण्यासाठी काय करावे अशी चर्चा करावी. माझे विचार देशात पोहोचायला हवेत. पण काय करणार? माझी ‘व्हॅल्यू’ मोदीकाकांना, त्यांच्या त्या ‘कमळ’वाल्यांना आणि नतद्रष्ट जनतेलाही कळत नाही. बरे तर बरे माझी बाजू मांडणारे आणि मला पूजणारे आता नवभक्त महाराष्ट्रात तयार झालेत. आता कोरोनामधून सावरण्यासाठी मीच काय ती उपाययोजना करू शकतो, याचा त्यांना भयंकर विश्वास आहे. कारण, त्यांना सत्तेवर बसवण्यामध्ये आमच्या ‘हाता’चा तर ‘हात’ आहे. नाहीतर आज त्यांना महाराष्ट्रात ‘कमळ’वाल्यांचा छोटा भाऊ बनून राहावे लागले असते.




आमचे काही लोक मला सांगतात की, तुम्ही राजकुमार आहात. तुम्ही एकदा चांगले ‘प्रोजेक्ट’ झालात की मग त्यांचाही एक राजकुमार आहे, तो म्हणे माझ्यासारखाच आहे. त्यालाही ‘प्रोजेक्ट’ करता येईल. खरे-खोटे अल्ला, येसू, देव जाणे. (तिघांचीही नावे घ्यावी लागतात. सेक्युलर आहोत ना!) पण मी जे बोललो, ते महाराष्ट्राला पण लागू होते. पण तिथे तर त्यांची ‘आय मीन’ आम्हा सगळ्यांची सत्ता आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आमची सत्ता असलेल्या चारही राज्यांत कोरोनाचा संसर्ग भयंकर आहे. पण त्याला मी आणि आमच्यासोबतचे सर्व पक्ष काही करू शकत नाही. कारण, आम्ही सर्वचजण फक्त ‘प्रेस कॉन्फरन्स’ घेऊन मोदींनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असा आरडाओरडा करू शकतो. बाकी जे काही करायचे ते मोदीकाका आणि त्यांचे सरकारच करणार. या सगळ्यामध्ये आम्हाला कुठेतरी ‘रोल’ पहिजे ना? म्हणून मी बोललो की, ’लॉकडाऊन हे ‘पॉझ’चे बटण आहे.’ ‘पॉझ’वरून आठवले, महाराष्ट्रात आम्ही ‘कमळ’वाल्यांना सत्तेपासून ‘लॉकडाऊन’ केले आहे. महाराष्ट्रातल्या माझ्या नवभक्तांना भीती वाटते की, हे ‘कमळ’वाल्यांसाठी केवळ ‘पॉझ’ बटण आहे. त्यांचे महाराष्ट्रातले सत्ता ‘लॉकडाऊन’ कधीही उठू शकते. खरे म्हणजे हेच चिंतन आणि चिंताही आहे. बाकी कोरोना बिरोना अंधविश्वास आहे. वाटल्यास महाराष्ट्रातल्या आमच्या नवभक्तांना विचारा...


रडा, पण काम करावेच लागेल
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला दर महिन्याला १० हजार कोटी असे पाच महिने ५० हजार कोटी द्यावेत, असे अजितदादांनी म्हटले. ते असे म्हणाले आणि कोरोनाच्या संकटसमयीही सगळ्यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले. आता वाटाघाटीचे सरकार असल्यामुळे वाटण्याशिवाय पर्याय नाहीच आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता. जे काय होणार ते वाट्यांनीच होणार.
महाविकास आघाडीचे हे सरकार आहे. त्यामुळे अमुक एका खात्याच्या मंत्र्याने त्याला नेमून दिलेल्या खात्यावरच काम करावे किंवा माहिती द्यावे असे काही नाही. कुणीही कशावरही निर्णय, मत देऊ शकतो. त्यामुळेच ‘आदर्श’ असे अशोक चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत. मात्र, ते राज्यात कुणाचा पगार होऊ शकतो, नाही होऊ शकत यावर मत मांडतात. तसेच राज्याचा प्रत्येक सत्ताधारी नेते सध्या काय करताना दिसतात. (सन्माननीय अपवाद वगळून).





कोरोनाविरोधात राज्याला कसे सुरक्षित ठेऊ शकतो, हा विचार कृती करण्यापेक्षा मोदींनी, केंद्र सरकारने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे, यावर मत मांडण्यात हे आघाडीवर आहेत. मात्र, राज्य चालवताना आपली काय जबाबदारी आहे, यावर यांचे अळीमिळी गुपचिळी आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे महाराष्ट्रावर राज्य म्हणून देश अन्याय करतोय, केंद्र सरकार पक्षपातीपणा करते, असे म्हणत केंद्र आणि राज्य या संविधानयुक्त कार्यप्रणालीबाबत जनतेत विद्वेष पसरवण्याचे विघातक कृत्य काही लोक करताना दिसत आहेत. हे सगळे निंदनीय आहे. कोणत्याही संकटासमोर महाराष्ट्र झुकणार नाही. ही संतांची आणि क्रांतीचीही भूमी आहे. इथे राहणारा कोणत्याही प्रांतातला असू दे. त्यालाही महाराष्ट्राची ताकद माहिती आहे. पण काहीच न करता केवळ आम्हाला कसे विरोधक सतावत आहेत, आम्हाला कुणी मदतच करत नाहीत, पैसेच देत नाहीत, असा कांगावा करत रडणार्‍यांना ती महाराष्ट्राची ताकद माहिती नाही का? जनमताच्या विरोधात सत्ता स्थापना केलेल्या राज्य सरकाला वाटते की कोरोना विषयावर आपण एकटे पडलो आहोत, असे दाखवून जनमत आपल्या बाजूने करू शकतो. पण ‘पब्लिक है ये सब जानती हैं।’ त्यामुळे कितीही रडा-भेका काम केल्याशिवाय पर्याय नाही.
@@AUTHORINFO_V1@@