कठीण प्रसंगात मदतीचा हात देणाऱ्या राष्ट्रांना ‘सलाम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2020
Total Views |

UN nations _1  



नवी दिल्ली
: आज संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे मात्र अशा परिस्थितीतही काही देश इतर देशांना मदत करत आहेत. भारतही आपल्याकडील हायड्रॉक्सिक्लोराक्वीन या औषधाचा व इतर आरोग्य सामग्रीचा पुरवठा इतर देशांना करत आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी अशा मदत करणाऱ्या सर्व देशांना सलाम ठोकत त्यांचे कौतुक केले आहे. भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केले आहे.



एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,“करोनाशी लढा देण्यासाठी सर्व जगात एकता निर्माण झाली पाहिजे अशी भावना संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. याचा अर्थ प्रत्येक देश जो मदत करण्यास समर्थ आहे त्याने इतर देशांना मदत केली पाहिजे. जे अशी मदत करत आहेत त्यांना आमचा सलाम आहे,” असे अँटोनियो ग्युटेरेस यांनी म्हटले असल्याची माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.



हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कोरोनावर मत करता यावी याकरिता हे औषध सध्या घेतले जात आहे. सर्वप्रथम अमेरिकेने भारताकडे हे औषध मिळावे अशी मागणी केली. अमेरिकेनंतर इतर देशांनीही भारताकडे आम्हाला हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर या मागणीत मोठी वाढ झाली आहे.केंद्र सरकारने ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने ही मागणी पूर्ण केल्यानंतर आपण भारताने उपकार विसरु शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.
@@AUTHORINFO_V1@@