आफ्रिदीच्या ‘त्या’ वक्तव्याला गंभीरचे सडेतोड उत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2020
Total Views |

gambhir_1  H x
मुंबई : भारतासाठी पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीची वक्तव्ये काही नवीन नाहीत. त्यात आफ्रिदी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांचे वाद अद्यापही सुरु असतात. असच एक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. शाहीद आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात ‘माजोरडा’ असा उल्लेख केला आहे. यावर आता गंभीरने सडेतोड उत्तर देत पुन्हा एकदा आफ्रिदीवर टीकास्त्र सोडले आहे.
 
शहीद आफ्रिदीच्या वक्तव्याला उत्तर देताना गौतम गंभीरने म्हंटले आहे की, “. स्वतःचं वय माहिती नसलेला माणूस आज माझ्या विक्रमांबद्दल बोलतोय. खोटारड्या आणि संधीसाधू व्यक्तींसाठी मी असाच माजोरडा आहे.” तर यावेळी त्याची विश्वचषकातील कामगिरीची आठवण आफ्रिदीला करून दिली.
 
आफ्रिदीने आपल्या गेम चेंजर या आत्मचरित्रात गौतम गंभीर हा सामान्य वकुबाचा क्रिकेटर असला तरी तो स्वत:ला उगाचच महान समजतो. त्यामुळे तो कायम अशा तोऱ्यात मिरवतो जसा की त्याच्यात डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बाँड यांचा मिलाफच झालेला आहे, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचेदेखील वक्तव्य केले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@