संकेतस्थळावर माहिती उपलब्ध
प्रतिनिधी (मुंबई) - एअर इंडियाने आपल्या तिकीट आरक्षणाची सेवा सुरू केली आहे. यामाधम्यातून आंतरदेशीय विमान प्रवासासाठी ४ मे पासून पुढे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी १ जून नंतरच्या तिकीटांचे आरक्षण करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ३ मे पर्यंत लाॅकडाऊन कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.
देशात लाॅकडाऊन जाहीर झाल्यापासून विमानसेवा ठप्प आहे. आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील सेवा बंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक उडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी ३ मे पर्यंत लाॅकडाऊन कायम राहणार ठेवला आहे. आता एअर इंडियाने ३ मे नंतर आपल्या तिकीटांच्या आरक्षणाची घोषणा केली आहे. ४ मे पासून आंतरदेशीय प्रवास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तिकीटांचे आरक्षण त्यांनी सुरू केले आहे. तर आंतरराष्ट्रीय सेवा १ जून नंतर सुरू करण्याची तयार एअर इंडियाने केली आहे. १ जून नंतर आंतरराष्ट्रीय मार्गावरील तिकीटांच्या आरक्षणाची सेवा सुरू करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध आहे.