जेव्हा एक वाघ दुसऱ्या वाघाला खातो; काय आहे घटना वाचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2020
Total Views |

tiger_1  H x W:

 

पशुवैद्यकांनी केली नोंद
 
 
 
प्रतिनिधी (मुंबई) - आसामच्या 'काझिरंगा राष्ट्रीय उद्याना'त मृत पावलेल्या वाघावर दुसरे वाघ ताव मारत असल्याची नोंद वनाधिकारी आणि पशुवैद्यकांनी केली आहे. वाघांमधील आपआपसातील संघर्षादरम्यान या वाघाचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी पाहणीसाठी गेलेल्या वनाधिकाऱ्यांनी या वाघाला दुसरे वाघ खात असल्याचे याची डोळा पाहिले.
 
 
 

 
tiger_1  H x W:
 
 
 
 
'काझिरंगा राष्ट्रीय उद्यान' हे एकशिंगी गेंड्यांच्या अधिवासाकरिता प्रसिद्ध आहे. मात्र, या उद्यानात वाघांचा देखील अधिवास आहे. उद्यानातील हरितक्षेत्रात १२१ वाघांचे अस्तिव आढळून आले आहे. दोन दिवसांपूर्वी उद्यानातील कोहोर्या वनपरिक्षेत्रातील मिहबली नदीच्या काठावर एका वाघाचा मृतदेह आढळून आला होता. हत्तीवरुन गस्त घालणाऱ्या वनकर्मचाऱ्याला हा मृतदेह दिसला. हा मृतदेह जवळपास तीन दिवस जुना होता.
 
 
 
 
दुसऱ्या दिवशी सकाळी हा मृतदेह ताब्यात घेण्याबरोबरच जागेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या वनधिकारी आणि पशुवैद्यकांना धक्का बसला. या मृतदेहाच्या शेजारी दोन वाघांचा वावर होता. त्यामधील एक वाघ मृत वाघाच्या शरीराची मागील बाजू खात असल्याचे आम्हाला दिसले, अशी माहिती 'कॉर्बेट फाउंडेशन'चे पशुवैद्यक डॉ. नवीन पांडे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी रात्री या वाघाला दुसरे वाघ खात असल्याचे पाहिले होते. हा वाघ साधारण १३ वर्षाचा नर होता आणि त्याचे दात खराब झाले असल्याचे पांडे यांनी सांगितले. तसेच त्याच्या डोक्यावर आढळून आलेल्या जखमा या दुसऱ्या वाघाने केेलेल्या हल्ल्याच्या वेळी झाल्याचे, ते म्हणाले. त्यामुळे या वाघाचा मृत्यू आपआपसातील लढाईदरम्यान झाल्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली. ही घटना दुर्मीळ नसून यापूर्वीही अशा घटनांची नोंद झाल्याचे त्यांनी नमूद केले. 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@