जग भारताकडे आशेने पाहतयं ! ५५ देशांना वैद्यकीय मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2020
Total Views |
PM Modi _1  H x
 
 
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (HCQ) या औषधाची मागणी वाढत आहे. याच्या पुरवठ्यासाठी अनेक देश भारताकडे आशा लावून बसले आहेत. भारतानेही आधी देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर या औषधांची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. मलेरियावरील औषध असलेले हायड्रोक्सीक्वोरोक्वीन एकूण ५५ देशांना निर्यात करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
 
 
 
 
या ५५ देशांमध्ये प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांग्लादेश, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, म्यानमार, सेशेल्स, ओमन, युएई, दक्षिण अफ्रीका, नायजेरिया, डोमिनिकन गणराज्य, युगांडा, मिस्र, आर्मेनिया, सेनेगल, अल्झेरिया, जमैका, उज्‍बेकिस्तान, कजाखस्तान, यूक्रेन, नेदरलँड, स्लोवेनिया, उरुग्वे, इक्वाडोर आदी देशांचा सामावेश होतो.
एकूण ५५ देशांनी केलेल्या या मागणीला आता तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यांतील देशांमध्ये औषधांचा पुरवठा सुरू झाला आहे. दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान वगळता अन्य सर्व देशांना हा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या भारताने या औषधांची निर्मिती कमी केली आहे. जसजशी मागणी वाढेल तसे याचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे.
 
 
 
 
भारताने यापूर्वी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवर बंदी आणली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीनुसार अमेरिकाला त्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. मानवतेच्या दृष्टीकोनातून भारताने इतर देशांनाही आता हा पुरवठा सुरू केला आहे. भारताने अमेरिकेला आत्तापर्यंत ३६ लाख टॅबल्बेट्स पोहोचवल्या आहेत. त्याशिवाय अन्य १५ देशांमध्येही हे औषध पोहोचवले आहे.
अमेरिका आणि ब्रिटनपासून रशिया, दक्षिण आफ्रीकासह युरोप, लॅटीन अमेरिका, अरब आणि आफ्रीकन देशांनाही भारताने औषधांचा पुरवठा केला आहे. कोरोना विषाणूवर अद्याप कोणतिही लस उपलब्ध झालेली नाही. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला हे औषध दिले जात आहे. त्यामुळे हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या मागणीत गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. असे असेल तरीही रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घ्याव्यात तसेच विनाकारण या गोळ्यांचा साठा करू नये, असे निर्देश सरकारने दिले आहेत.
 
 
 
भारत सर्वात मोठा उत्पादक देश
 
 
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या गोळ्यांची निर्मिती करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे. यामुळेच भारताकडे या औषधाची मागणी जगभरात वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार, सर्वात आधी भारतातील मागणीचा विचार करून मगच इतर देशांना या औषधाची निर्यात केली जाणार आहे. कोरोनावर इलाज करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन महत्वाचे ठरत आहे. याच साठी जगभरातील देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतूक केले आहे.



 
 
 
@@AUTHORINFO_V1@@