कोरोनामुक्तांचे न्यूज बुलेटिन काढा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020
Total Views |
Raj Thackeray_1 &nbs


राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई : कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांची माहिती लोकांना कळावी आणि डॉक्टरांच्या उपचारांवर त्यांच्या विश्वास बसावा यासाठी आठवड्यातून एक न्यूज बुलेटिन काढावे, अशी सूचना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. 'कोरोनाच्या आजारातून ठणठणीत बरे होणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्या संदर्भातील माहिती योग्य प्रकारे प्रसिद्ध केल्यास लोकांना दिलासा मिळेला. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास वाढेल, असे ते म्हणाले.
 
 
करोनाचा लढा सुरू झाल्यापासून राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असून सरकारला काही सूचना करत आहेत. राज यांनी बुधवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलून काही गोष्टी निदर्शनास आणल्या. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 'करोनाच्या आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आश्वासक आहे. कल्याणमधील ६ महिन्यांच्या मुलीसह हजारो जण करोनामुक्त झाले आहेत. मात्र, या आकडेवारीला सरकारी व इतर माध्यमांच्या पातळीवर पुरेशी प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. नागरिकांना ही माहिती मिळाल्यास त्यांचा डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल, असे राज यांनी म्हटले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@