मध्यप्रदेशातील वनरक्षकाकडेच सापडले वाघाचे अवयव; मेळघाट वाघ मृत्यू प्रकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020
Total Views |
tiger _1  H x W

मेळघाटमधील 'टी-२३' वाघाचे अवयव काढून त्याला जाळण्यात आले

 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील 'टी-२३' हा वाघ मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर वन परिक्षेत्रात मृतावस्थेत सापडला होता. वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मध्यप्रदेश वन विभागाने केलेल्या चौकशीअंती एका वनरक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मृत वाघाचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी मेळघाट प्रशासनाने देखील दोन आरोपींना अटक केली आहे.
 
 
 
 
 
मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार वनपरिक्षेत्रात १३ एप्रिल रोजी वाघाचा मृतदेह आढळून आला होता. मेळघाटमधील आंबाबरवा वन्यजीव अभयरण्यात अधिवास करणारा 'टी-२३' नामक वाघाचा तो मृतदेह होता. आंबाबरवा वनपरिक्षेत्राला लागूनच असलेल्या मध्यप्रदेशातील खकनार परिक्षेत्रात त्याचे कुजलेले शरीर आढळून आले होते. मध्यप्रदेश वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी जागेवर पोहचण्यापूर्वीच वाघाचे शरीर अज्ञातांकडून जाळण्यात आले होते. वाघाला जाळण्यापूर्वी त्याचे अवयव काढण्यात आले. या प्रकरणी मध्यप्रदेशातील वनधिकाऱ्यांनी तेथील वनरक्षक दिवाकर शर्माची धरपकड केली आहे. त्याच्याकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून मृत शरीर जाळणाऱ्या अज्ञाताचा देखील शोध घेण्यात येत आहे.
 
 
 
 
दुसऱ्या बाजूला मेळघाट प्रशासनाने देखील दोन आरोपींंना अटक केली आहे. रूपचंद उर्फ बोंद्रिया बुद्धा आणि ज्योती उर्फ गुताली बरेला या दोघांना मेळघाटाला लागूनच असलेल्या मध्यप्रदेशातील गावांमधून अटक करण्यात आली आहे. खकनार वनाधिकाऱ्यांनी मेळघाट प्रशासनाला या वाघाची विषबाधेमुळे हत्या झाली आहे का ? यासंदर्भात तपास करण्यास सांगितला होता. त्याअनुषंगाने तपास केल्यावर मेळघाटच्या अकोट वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना जमजले की, बरेला हिने गावाने मारलेल्या गाईवर विषबाधा केली होती. त्यामुळे गाईचे विषारी मांस खाऊन वाघ मरण पावला. याऊलट बुद्धा याच्याकडून वाघाचे काही अवयव हस्तगत करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@