कोरोनाच्या संकटात पाणीटंचाई : अंकाई गावात माणुसकीच्या झऱ्याचे दर्शन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020
Total Views |


yevala_1  H x W

 


‘माणुसकी फाउंडेशन’च्या तरुणांनी केली पाणीटंचाईवर मात



येवला : कोरोनाचे संकट असतानाच अंकाई गावावर पाणी टंचाईच महासंकट उभे ठाकले. अंकाई ग्रामपंचायतने व्हाट्सअपग्रुप वर कोरड्या विहीरीचे फोटो टाकून, ‘आता नळाला पाणी येणार नाही. पाणी संपले.’ असे जाहीर केले आणि गावात वेगवेगळी चर्चा होऊ लागली. एकीकडे प्रशासन घरात राहण्याचे आवाहन करत होते आणि दुसरीकडे पाणीटंचाईमुळे वणवण भटकावे लागणार अशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती निर्माण व्यक्त केली जात होती. त्यात एकच ठिकाणी असलेल्या हातपंप वर खूप गर्दी होऊ लागली.

 
 
 
 
 

गावातील काही तरुण मित्रांनी ग्रामपंचायतच्या दुसऱ्या पूरक विहरित पाणी असल्याची माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिली. परंतु, त्या विहीरीची मोटार नादुरुस्त असल्याची बाब समोर आली. ही बाब ओळखून ‘माणुसकी फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अलकेश कासलीवाल यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यांनी सर्व तरुणांना सोबत घेत जुन्या विहीरीतील मोटार स्वतः मदत करून बाहेर काढली. ती मोटार पूरक योजनेच्या विहिरीत सोडून स्वखर्चाने जोडणी केली. त्यानंतर आजूबाजूच्या शेतकरी बांधवना कासलीवाल यांनी विनंती केली की ज्यांचे पीक उभे नसतील त्यांनी त्यांच्या विहिरीचे किंवा बोअरवेलचे पाणी गावाला द्यावे. त्यांच्या या आवाहनाला साथ देत या गावचे दानशूर शेतकरी शरद भागवत सोनवणे यांनी त्यांचे बोअरवेलचे पाणी बिनशर्त गावाला देण्याचे कबूल केले.

 

१५०० फूट पाईपलाईन करून त्या विहीरिमध्ये पाणी सोडण्यात आले. विहिरीतील ते पाणी ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा टाकीमध्ये भरण्यात आले. लवकरच दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येईल हे समजताच आनंदोउत्सव साजरा करत नागरिकांनी तरुणांचे आणि ‘माणुसकी फाउंडेशन’चे अध्यक्ष अलकेश कासलीवाल यांचे आभार मानले. या कामामध्ये किरण बडे, छोटू वाघ, डॉ. प्रीतम वैद्य ,सर्जेराव व्यापारे ,श्यामा परदेशी, रवींद्र चव्हाण, सागर सोनवणे ,श्रीराम सोनवणे, पप्पू व्यापारे, धर्मा परदेशी, अतुल व्यापारे, मेहबूब पठाण ,शंकर चव्हाण ,अमोल सोनवणे ,सुनील यापारे ,सचिन व्यापारे, भाऊसाहेब वैद्य, लहानुभाऊ सोनवणे, मारुती वैद्य ,भाऊसाहेब टिटवे,राहुल देवकर या तरुणांची मोलाची मदत केली.

 
 

“पाण्यासाठी आमचे खूप हाल होत होते. परंतु, आम्हाला नेहमी मदत करणारे माणुसकी फाउंडेशनचे अलकेश कासलीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर उन्हाळ्यामध्ये पाण्याचे काम केल्याने आम्ही सर्व महिला खूप आनंदीत आहोंत आणि त्यांचे आभारी आहोत.”

 

सरला रविंद्र काळे

- अध्यक्ष बचत गट समूह अंकाई

 
 
@@AUTHORINFO_V1@@