कोरोना तपासणीसाठी चीनकडून साडेसहा लाख किट भारतात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020
Total Views |

testing kit_1  
नवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अधिकाधिक लोकांच्या चाचण्या होणे गरजेचे आहे.या चाचण्यांसाठी चीनने पहिल्या टप्पातील चाचणी किट भारताला पाठविले आहेत. चीनने गुरुवारी भारतासाठी साडेसहा लाख रॅपिड अँटीबॉडी आणि आरएनए चाचणी किट देणार असल्याचे चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली.


त्याच वेळी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) रमन आर. गंगाखेडकर म्हणाले की, कोरोना चाचणी किटचा पहिली खेप चीनकडून १६एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत पोहोचेल. गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारपर्यंत देशात २ ,०६ ,२१२इतक्या चाचण्या झाल्या आहेत. ते म्हणाले की, पुढील सहा आठवडे चाचण्या घेता येतील इतका पुरेसा साठा देशात आहे.भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली असून १०१९७ वर पोहोचली आहे. देशभरात ३९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर जगभरात करोनामुळे एक लाख २७ हजार ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लागण झालेल्यांची संख्या २० लाख १५ हजार ५७१ इतकी आहे. केवळ युरोपमध्ये १० लाख तीन हजार २८४ जणांना लागण झाली असून ८४ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@