शबरीमलासह अन्य मंदिरातील सोने केले जाणार 'डिपॉझिट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2020
Total Views |

travankor borad temple_1&
 
 


आलाप्पुझा : त्रावणकोर देवस्थान बोर्डाअंतर्ग येणाऱ्या मंदिरांच्या तिजोरीत असलेले सोने रिझर्व्ह बँकेकडे ठेव स्वरुपात जमा करण्यात येणार आहे. या अंतर्गत शबरीमला मंदिराचाही सामावेश होतो. रिझर्व्ह बँकेत पहिल्या टप्प्यात २४ किलो सोने आणि चांदी डिपॉझिट करण्याचा विचार आहे. यामुळे दोन टक्क्यांपर्यत परतावा बोर्डाला मिळणार आहे. दरम्यान, रोजच्या पूजेसाठी लागणारे स्वर्णालंकार मंदिरातच असतील मंदिराच्या तिजोरीतील इतर मौल्यवान वस्तू या जमा केल्या जातील, अशी माहिती मंदिर बोर्डाने दिली आहे.

एकूण सोने-चांदी किती याची माहिती घेण्याची प्रक्रीया आता सुरू केली जात आहे. तसेच याचे मुल्यमापनही सुरू आहे. सोने आणि चांदीला तीन भागांमध्ये विभागले जाणार आहे. पहिला म्हणजे स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येणारे सोने, दुसरे देवी देवतांना चढवण्यात येणारी आभूषणे, म्हणजे असे सोने कि ज्यांची पारंपारिक दृष्टया गरज भासत नाही. तिसऱ्या भागात ऐतिहासिक महत्व असलेले अलंकार. फेब्रुवारीमध्ये याची घोषणा झाली होती. मात्र, याच्या प्रक्रीयेसाठी लवकरच सुरूवात होणार आहे.


मंदिरात दान स्वरुपात मिळणाऱ्या दागदागिन्यांना दैनंदिन वापरासाठी उपयोग केला जात नाही. या सर्व दागिन्यांना सोन्याच्या बारमध्ये परावर्तित करण्यात आले आहे. त्यानंतर हे सोने रिझर्व्ह बँकेत ठेवण्याचा विचार आहे. दरम्यान, या प्रक्रीयेमुळे काही अड़चणीही बोर्डासमोर आहेत. भक्तांच्या श्रद्धेचा विषय ठरत असल्याने आता या प्रकरणी वादविवादही सुरू आहेत. आपण दिलेले रत्नाहार किंवा सुवर्णालंकार पुन्हा बारमध्ये परावर्तित होत असल्याचे समजल्याने भक्त दान करणेही थांबवतील, अशीही परिस्थिती आहे.
@@AUTHORINFO_V1@@