चेहऱ्याला स्पर्श करून तुम्ही कोरोनाला निमंत्रण देत नाहीत ना !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2020
Total Views |
Do not touch your face_1&
 



वॉशिंग्टन : कोरोना विषाणूमुळे जगभरात १.२० लाख मृत्यू झाले आहेत तर २० लाख लोकांना याची लागण झाली आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी सेंटर फॉर डीझिझ कंट्रोल (सीडीसी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ) यांच्यातर्फे पहिल्या दिवसापासूनच दर दोन तासाला हात धुणे, नाक, डोळे, कानाला स्पर्श करण्यासाठी मनाई करत आहे. मात्र, काही केल्या लोकांची वारंवार चेहेऱ्याला स्पर्श करण्याची सवय जात नाही, असा निष्कर्ष आहे.

एका तासाला सरासरी २३ वेळा स्पर्श करत असल्याचे निरीक्षण आहे. यात डोळे, कान नाक, डोके, गळा अशा विविध अवयवांना एक सर्वसाधारण माणूस वारंवार स्पर्श करत असतो. न्युयॉर्क टाईम्सनुसार, डॉ. नैंसी सी. एल्डर, डॉ. विलियम पी. सॉयर आणि ऑस्ट्रेलियाच्या डॉ. मैक्लाव्स यांनी केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे. हे सर्वजण याचा अभ्यास करत होते. चेहऱ्याला विनाकारण स्पर्श करण्याची सवय मोडली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 


 
डोळे, कान आणि नाकाला स्पर्श करण्याची सवय सहज सुटणार नाही


पोर्टलॅण्ड स्थित ओरेगन हेल्थ अॅण्ड सायन्स विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. नॅन्सी सी एल्डर यांच्यामते, डोळे, कान, नाकाला स्पर्श करण्याची वाईट सवय सुटता सुटणार नसल्याचे म्हटले आहे. डॉ. नॅन्सी यांनी आपल्या एका अभ्यासात नमुद केल्यानुसार, ७९ आरोग्य कर्मचाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले होते. तासाभरात त्यांनी आपल्या चेहऱ्याला कितीवेळा स्पर्श केला याची तपासणी केली. तासाभरात या सर्वांनी १९ वेळा चेहऱ्याला वारंवार स्पर्श केला. कोरोना विषाणू आपल्या श्वसन प्रणाली, डोळे, कान आणि नाक या अवयवांतून प्रवेश करू शकतो, त्यामुळे या सवयी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.


सार्वजनिक ठिकाणी या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष


ओहीओ येथील फिजिशिअन आणि Henrythehand.com चे संस्थापक डॉ. विलियम पी. सायर हे लोकांना हात निर्जंतूकीकरण करण्याबद्दल आणि विनाकारण चेहऱ्याला स्पर्श करणे कसे टाळावे याचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या या उपक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण सहभागी होतात. ते म्हणतात, ही एक कठीण सवय आहे. ते म्हणतात, सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच रेल्वे, बस, मेट्रो, टॅक्सी आदी ठिकाणी लोक वारंवार तिथल्या वस्तूंना स्पर्श करतात. त्यानंतर चेहऱ्याला विनाकारण स्पर्श करतात. तुम्ही तसे करणे टाळलेत तर तुम्हाला संक्रमित आजार होण्याचा धोका कमी होतो.


एका मिनिटाला २३ वेळा चेहऱ्याला स्पर्श


सिडनी येथील साऊथ वेल्स विद्यापीठात महामारी आणि संक्रमण विषयावर शिकवणाऱ्या प्राध्यापिका आणि २०१५ साली ‘फेस टचिंग’ नामक विषयावर अध्ययन करणाऱ्या डॉ. मॅरी-लुईस मैक्लाव्स यांच्या मते, त्यांनी तयार केलेला अहवाल हा कोरोनाच्या काळात प्रकाशझोतात आला आहे. त्यांनी आपल्या अहवालात २६ विद्यार्थ्यांवर एक संशोधन केले होते. त्यात प्रत्येकजण सरासरी २३ वेळा आपल्या संपूर्ण चेहऱ्याला स्पर्श करत असतो, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. जगभरात त्यांच्या सुरू असलेल्या प्रवासात त्यांनी केलेल्या निरिक्षणातही त्यांना काही वेगळे जाणवले नाही. अनेकजण सवयीनुसार चेहऱ्याला वारंवार स्पर्श करत असतात. ही सवय जरी सर्वसामान्य वाटत असली तरीही लोकांना या महामारीच्या काळात सोडायचा किमान प्रयत्न तरी करायला हवा, असे आवाहन त्या करतात.




@@AUTHORINFO_V1@@