पुण्यात दिवसभरातील तिसरा कोरोना बळी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2020
Total Views |

pune_1  H x W:


पुण्यात कोरोना बळींची संख्या चिंताजनक

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. आज पुण्यात ६३ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे पुण्यात कोरोनामुळे झालेला हा दिवसभरातला तिसरा मृत्यू आहे. त्यामुळे आता पुण्यातील कोरोना बळींची संख्या ३९ वर येऊन पोहोचली आहे. तर पुण्यात आणखी एक कोरोना संशयित रुग्ण आढळून आला आहे.


आज ससून रुग्णालयात दोन कोरोना बाधित पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक ७३ वर्षीय, तर दुसरा ३४ वर्षीय होता. ७३ वर्षीय पुरुषाला न्युमोनिया झालेला होता. तर ३४ वर्षीय तरुणाला स्थूलतेचा आजारही होता. त्यानंतर ससून रुग्णालयातच आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.


पुणे शहराजवळील वाघोली या उपनगरात आणखी एक कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे. एका ड्रायव्हरला झाली कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. संशयित रुग्णाचे वय ४५ वर्षे आहे. एका खाजगी लॅबचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या संशयिताला पुढील तपासणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, कुटुंबांतील व्यक्तींना देखील तपासणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींनाही होम क्वारांटाईन करण्यात आले आहे.


खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वाघोली गाव बंद राहणार आहे. लोकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@