पर्यटनमंत्री मोबाईलवर खेळत नसते तर ही वेळ आली नसती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2020
Total Views |
Aditya Thackeray in PM co
 
 
 
मुंबई : वांद्रे स्थानकात लॉकडाऊनच्या उडालेल्या फज्ज्यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्राला जबाबदार धरत केलेल्या बाळबोध प्रश्नाला भाजप आमदार नीतेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जर मोबाईलवर खेळत बसला नसता तर असा प्रश्न विचारला नसता असा टोला त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना हाणला आहे.

 
वांद्रे स्थानकात परराज्यातून आलेल्या मजूरांनी ठिय्या मांडत पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, यामुळे प्रशासनावर काहीकाळ ताण आला होता. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. मात्र, राज्याचे पर्यावरणमंत्री व कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे यांनी पूर्णपणे केंद्र सरकारला जबाबदार धरत इथले मजूर राहण्यासाठी जेवणाची सोय स्वीकारण्यासाठी नकार देत आहेत, असे म्हटले. 




 
त्यांना आपापल्या घरी परत जायचे आहे. केंद्राने २४ तासांसाठी रेल्वे का सुरू केली नाही, असा सवाल आदित्य यांनी केला. यावर नीतेश राणे यांनी आदित्य यांना धारेवर धरले. नीतेश राणे म्हणाले, "राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन यापूर्वीच वाढवला होता. केंद्राचा निर्णय आज घेण्यात आला, पर्यटनमंत्र्यांनी याबद्दल घरीच विचारले असते तर हा प्रश्न पडला नसता. तसेस पंतप्रधानांच्या कॉन्फरन्समध्ये मोबाईलवर लक्ष देत बसला नसता तर हा विषय आलाच नसता."


आज जे वांद्रेमध्ये दिसले ते उद्या मुंबईमध्ये राहणारे कोकणातले लोक पण असू शकतात. सरकार त्यांना आपआपल्या गावी जाऊ नका अस सांगत आहे पण मुंबई मधल्या १० बाय १०च्या खोलीत घरात राहणे शक्य नाही, त्यांना धान्य तरी सरकार नी द्यावे नाहीतर त्यांचा ही असाच उद्रेक होईल! मुख्यमंत्री सतत बोलत आहे जिथे आहात तिथेच रहा सरकार तुमची काळजी घेईल. अस होत नाही आहे म्हणुनच उद्रेक होत आहे!, असेही राणे म्हणाले,


@@AUTHORINFO_V1@@