जाणून घ्या ! कम्युनिटी किचन म्हणजे काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2020
Total Views |
Community Kitchen Ambarna
 




अंबरनाथला कम्युनिटी किचनला सुरुवात


अंबरनाथ : कोरोनामुळे अनेकजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशपातळीवरील असो किंवा स्थानिक पातळीवर सर्वच जण कोरोनाशी लढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अशातच अनेक ठिकाणी कम्युनिटी किचनची सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, कम्युनिटी किचन म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याबद्दल जाणून घेऊयात.
 
अंबरनाथमध्ये विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमाातून कम्युनिटी किचनला सुरुवात झाली आहे. उपविभागीय अधिकारी गिरासे यांच्या तहसीलदार जयराज देशमुख यांच्या उपस्थितीत साई विभागातील सूर्योदय सोसायटीच्या सभागृहात तहसील कार्यालय आणि सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यातून किचनमध्ये तयार होणारे अन्न पॅकिंग करून ते गरजूपर्यंत पोहोचवले जाणार आहे. सोमवारी (१३) एप्रिल रोजी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी तहसीलदार जयराज देशमुख यांची भेट घेऊन कम्यु निटी किचन सुरु करण्याबाबत चर्चा केली होती . 
म्हणजेच जिथे जिथे मजूर किंवा गोरगरीबांची लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे, अशा व्यक्तींना एकत्रित जेवण बनवून ते पोहोचवण्याचे काम या माध्यमातून केले जाते. याशिवाय ज्या नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाही अशा कुटूंबियांप्रमाणे रोजंदारावर काम करणारे कामगार आणि बेघरांना किचनच्या माध्यमातून जेवण पुरवले जाते. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निर्देशात या किचनची देखरेख होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आखून देण्यात आलेले सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात येतात. दररोज गरजूंपर्यत गरजूंपर्यंत लागणारे अन्न पाकिटांतून वाटप करण्यात येते.
@@AUTHORINFO_V1@@