'राज्य सरकारकडून मदत मिळत नाही', स्थानिक कॉंग्रेस आमदाराचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2020
Total Views |




Bandra_1  H x W


वांद्रा पूर्वचे आमदार झीशान सिद्धिकी यांनी सरकारला दिला घरचा आहेर


मुंबई (प्रतिनिधी): राज्य सरकार कोणतीही मदत करत नाही, आम्ही आमच्यापरीने करत होतो, असा आरोप वांद्रा पूर्वचे आमदार झीशान सिद्धिकी यांनी केला आहे. वांद्रे स्थानकाबाहेर अचानक गर्दी जमा झाली. या पार्श्वभूमीवर सिद्धिकी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. त्यादरम्यान सरकारकडून मदत मिळत नसल्याचे, विधान त्यांनी केले.


सरकारकडून अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही, आम्ही आमच्यापरीने अन्न्धान्न्य पुरवतो आहोत, असे विधान सिद्धिकी यांनी केले. वांद्र्यात मजुरांनी गर्दी का केली या प्रश्नाचे निराकरण करण्याचा प्रयत्न ते करत होते. 


वांद्रे पूर्व येथे जमा झालेल्या गर्दीनंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी , पंतप्रधानांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांनी २४ तास रेल्वे सुरु करण्याची अनाकलनीय मागणी केली म्हणून टीकेचे लक्ष ठरले. मात्र वांद्र्याचे स्थानिक आमदार यांनी सगळा रोष राज्य सरकारवर व्यक्त केला आहे. भविष्यात ही मदत मिळेल, असा आशावाद व्यक्त करायला सिद्धिकी विसरले नाहीत.


@@AUTHORINFO_V1@@