आव्हाड 'होम क्वारंटाईन'; कोरोनाबाधित पोलीसाशी संपर्क

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020
Total Views |
Jitendra Awhad_1 &nb
 
 
ठाणे : कोरोना पॉझिटीव्ह पोलीसाच्या संपर्कात आल्यामुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या इतर काही जणांनाही होम क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याचे समजते. मुंब्रा येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.


जितेंद्र आव्हाड हे त्याच्या संपर्कात आलेले असल्यानं त्यांनीही 'होम क्वारंटाइन'चा निर्णय घेतला. काही पत्रकारही या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची शक्यता आहे. त्यांनाही प्रशासनाने क्वारंटाईन होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांचा संपर्क कोरोना बाधितांशी येत आहे, अनेक ठिकाणी जनतेला आवाहन करूनही लोक रस्त्यावर फिरत आहेत, अशातच पोलीसांनाही कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान, मुंब्रा येथील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्तव्यावर असताना त्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले.


जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून आपल्या मतदार संघात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत होते. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी स्वतः जाऊन माहिती देत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत काही पत्रकार, पोलीस आणि अन्य कार्यकर्ते सोबत होते. पोलीस अधिकाऱ्याशी संपर्कात आल्याने या सर्वांना आता होम क्वारंटाईल व्हावे लागणार असून सर्वांच्या चाचण्या होण्याचीही शक्यता आहे.
@@AUTHORINFO_V1@@