मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वतःचे रुग्णालय दिले पालिकेच्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020
Total Views |
Raju Patil_1  H

डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदार संघाचे मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी डोंबिवलीतील १५ ते २० व्हेटंटीलेटर असलेले १०० बेडचे सर्व सुविधा युक्त असे आर. आर. रुग्णालय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. मनसे आमदार राजू पाटील ह्यांना २४ मार्चला पालिका आयुक्तांनी सूचना केली होती की, कोरोना रुग्णांसाठी शहरातील एखादे खाजगी हॉस्पिटल पूर्णत: COVID19 साठी घ्यावे, जेणेकरुन डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना चांगली सुविधा मिळेल,

यासाठी राजू पाटील यांनी यांनी स्वतःचे आर. आर. रुग्णालय तात्पुरते ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती, पालिका आयुक्तांनी याला मान्यता देत इथे कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची तयारी सुरू केली आहे. डोंबिवलीतील पहिले खासगी रुग्णालय तयार असून रुग्णांवर उपचार हॉस्पिटल मधील आणि आयएमएचे डॉक्टर करणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@