नवी दिल्ली : केंद्र सरकारने आरोग्यसेतू हे अँप लॉन्च केले जे जे आपल्याला कोरोना विषाणूची चाचणी घेण्याची आवश्यकता आहे की नाही या लक्षणांच्या आधारे सांगते. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या परिसरात कोणी कोरोना संक्रमित आहे कि नाही याबाबत माहिती देते. म्हणूनच केंद्र सरकारने लोकांना हे अँप डाउनलोड करण्याचा आग्रह केला आहे. हे अँप सुरु करून भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले असल्याचे तज्ज्ञ व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींचे म्हणणे आहे.आरोग्य सेतू अँप लॉन्च होताच काही दिवसात तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेली कंपनी अँपल व गुगलने आपणही कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणारे सॉफ्टवेअर तयार करीत असल्याचे सांगितले. जागतिक बँकेनेही या अँपचे कौतूक करत भारत सरकार कोरोनाशी लढण्यासाठी योग्य पाऊले उचलत असल्याचे म्हणले आहे.
जागतिक बँकेने रविवारी आरोग्य सेतू अँपचा उल्लेख असणारा एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी म्हणले आहे की या अँपमुळे एक मोठी लोकसंख्येला जागरूक करण्यासाठी व संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी हे अँप महत्वपूर्ण भूमिका बजावेल. त्याचबरोबर जागतिक बँकेच्या दक्षिण आर्थिक केंद्रीय अहवालात सांगितले आहे की, कोरोनाशी लढा देण्यात ऐच्छिक उपक्रमांची मोठी मदत होते आहे. पूर्व आशियातील साथीच्या रोगाचा सामना करण्यास मोठ्या प्रमाणात ऐच्छिक असे उपक्रम यशस्वी ठरले आहेत. याबरोबरच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.