कोरोनाविरुद्ध संघर्ष : ६ वर्षीय चिमुकलीने जमवलेले पैसे दिले मुख्यमंत्री निधीत

    13-Apr-2020
Total Views |

madhya pradesh_1 &nb
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरामध्ये पंतप्रधान निधी तसेच मुख्यमंत्री निधीमध्ये आपले योगदान देत आहेत. मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान सरकार कोरोनाचा प्रसार कमी व्हावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. त्यातच सरकारच्या या कार्यात आपला खारीचा वाटा असावा, यासाठी धार जिल्ह्यातील महिमा मिश्रा या ६ वर्षीय मुलीने स्वतःला सायकल खरेदी करता यावी म्हणून जमा केलेली राशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.
 
 
धार जिल्ह्यातील कुक्षी येथे राहणाणाऱ्या या ६ वर्षीय चिमुरडीने नक्कीच कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महिमाने कोरोना विरूद्ध लढण्यासाठी आपल्या सायकलसाठी गोळा केलेली सर्व रक्कम मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केली आहे. यासाठी तीने मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहिले आहे. तसेच हे पत्र तहसीलदारांजवळ दिले आहे.महिमा मिश्रा हिच्या या योगदानाचे कुक्षीच्या तहसीलदारांनीही कौतुक केले आहे.