डोंबिवलीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020
Total Views |
India Against Corona_1&nb




डोंबिवली कोरोना अपडेट्स - कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५६


कल्याण : डोंबिवली पश्चिमेला आज कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला असून महापालिका क्षेत्रातील आणि निळजे आरोग्य केंद्रातील रुग्ण धरून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५६ झाला आहे. त्यापैकी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेत आज सापडलेला रुग्ण हा ३० वर्षांचा तरुण आहे. त्याला कोरोना होण्याच्या कारणाबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ५६ वर पोहोचली असून त्यापैकी १२ जण बरे झाले आहेत. तर ४२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

आजपर्यंतचे एकुण रुग्‍णः- ५६ पैकी – २ मयत, १२ डिसचार्ज (१ निळजे आरोग्‍य केद्रातील धरुन)

एकुण उपचार घेत असलेले रुग्‍ण ४२

महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण :- ५५ रुग्णांपैकी – २ मयत, ११ डिसचार्ज

एकुण उपचार घेत असलेले रुग्‍ण ४२

कल्याण पूर्व १३

कल्याण पश्चिम ७

टिटवाळा १

मोहने १

डोंबिवली पूर्व २६

डोंबिवली पश्चिम ८


@@AUTHORINFO_V1@@