सावधान! बनावट 'पीएम केअर' वेबसाईट तयार करत ५३ लाखांचा गंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2020
Total Views |
Hacker_1  H x W






रांची : कोरोना महामारीशी लढण्यासाठी एकीकडे देश एकत्र येत असताना काही ठक या संधीचा फायदा उचलत लूट करण्याच्या तयारीत आहेत. झारखंडमध्ये काही लोकांनी पंतप्रधान मदतनिधीची बनावट वेबसाईट तयार करत ५३.५८ लाखांचा गंडा दान करणाऱ्यांना घातला आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर पोलीसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
झारखंडच्या हजारीबाग येथे राहणारे दोघे भाऊ नूर हसन आणि मोहम्मद इफ्तेखार यांना पोलीसांनी अटक केली आहे. पीएमकेअर डॉटकॉम नामक वेबसाईट बनवत देशभरातून मदत करणाऱ्या लोकाना ठकण्याचे काम केले आहे.



लोकांना मदत करण्यासाठी आवाहन केले, या माध्यमातून एकूण ५३ लाख ५८ हजारांचा गंडा त्यांनी मदत करणाऱ्यांना घातला. विशेष म्हणजे ज्या खात्यावर हे पैसे जमा झाले त्यावर पीएमकेअर असे नाव होते त्यामुळे लोकांनी या प्रकारावर विश्वास ठेवला.
हजारीबाग येथील दोनशे लोकांनी ३४ लाख ८७ हजार आणि युनियन बँकेतून १७ लाख ७०१ रुपये मदत म्हणून जमा केले. मदत केल्यानंतर या ठगांनी जमा रक्कम विविध खात्यांमध्ये वळती केली. सतत होणाऱ्या या व्यवहारांमुळे बँकेला संशय आला. पीएनबी बँक बडी बाझार शाखा व्यवस्थापक सुजीत कुमार सिंह आणि युनियन बँक अन्नदा चौक शाखा अमित कुमार व्यवस्थापक यांनी या प्रकाराचा शोध घेतला. हा व्यवहार करणारे दोघेही भाऊ असल्याचे समजले.


यानंतर ९ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार करण्यात आली. पोलीसानी संबंधित खातेधारकांच्या पत्त्यावर धाड टाकली. त्यावेळेस हा प्रकार त्यांनी कबुल केला. दोघांच्याही मुसक्या आवळून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. यांच्या चौकशीत यांचा आणखी एक म्होरक्या परमेश्वर साव याचे नाव उघड झाले आहे. मात्र, हा सध्या फरार आहे.
परमेश्वर सावच्या घरावर छापेमारी केल्यानंतर मोठ्या संख्येने बँक पासबूक, चेक बुक, एटीएम कार्ड आणि अन्य साहित्य आढळले आहे. परमेश्वर सावने या दोन्ही अटक आरोपींना काही रक्कमेच्या मोबदल्यात त्यांचे पासबूक स्वतःजवळ ठेवण्याची विनंती केली होती. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. त्यामुळे मदत करण्यापूर्वी एकदा मदतनिधी खात्याची माहिती तपासून घेण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@