राज्यात लॉकडाऊनचा उडवला जातोय फज्जा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2020
Total Views |

lockdown_1  H x



प्रांताधिकाऱ्यांचे पत्र दाखवत राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाचा लॉकडाऊनमध्ये प्रवास


पुणे : लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाने केलेला प्रवास चर्चेत असताना, तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या भावाने प्रांताधिकाऱ्यांचे कथित पत्र दाखवून पुणे-मुंबई असा प्रवास केला. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी हे पत्र आपण दिलेच नसल्याचे स्पष्ट केल्याने, या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊन नितीन भोसले यांनी लॉकडाऊनमध्ये प्रवास केला.


नितीन भोसले यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या नातेवाईकाला आणण्यासाठी ८ एप्रिलला पुणे-मुंबई असा प्रवास केला. त्यासाठी मावळचे प्रांत संदेश शिर्के यांनी प्रवास करण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. मात्र, आपण पत्र दिले नसल्याचा स्पष्टीकरण संदेश शिर्के यांनी दिल्याने, भोसले यांच्याभोवती संशयाचे ढग आहेत. नितीन भोसले यांच्यासह चार जणांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी आपण पत्रच दिले नसल्याचे म्हटले आहे.


प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या सहीचे हे पत्र आहे. मात्र आपण असे पत्रच दिले नाही. माझ्या कार्यालयातील कोणी क्लार्कने जर असे पत्र दिले असेल, तर मी माहिती घेऊन कारवाई करेन, असे संदेश शिर्के यांनी म्हटले.


राष्ट्रवादी विधानपरिषदेचे आमदार असलेले अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळाप्रकरणात येरवडा जेलमध्ये आहेत. अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह १६ जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

@@AUTHORINFO_V1@@