गुजरातमध्ये स्थलांतरित कामगारांकडून हिंसाचार

    11-Apr-2020
Total Views |

surat_1  H x W:


घरी जाण्याची परवानगी मागत कामगारांकडून दगडफेक 


सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले, या कामगारांनी हातगाड्यांची जाळपोळ आणि इतर सार्वजनिक संपत्तीची तोडफोड केली. पगार मिळावा तसेच घरी जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करत, कामगारांनी दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ६०- ७० लोकांना ताब्यातही घेतले आहे.

'कामगारांनी अनेक रस्ते अडवून ठेवले होते तसंच दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ६० ते ७० लोकांना ताब्यात घेतले आहेत. हे सर्व लोक घरी पाठवण्याची सोय करावी अशी मागणी करत असल्याचं आम्हाला कळालं आहे,” अशी माहिती डीसीपी राकेश बरोत यांनी दिली आहे.

घरी जाण्यासाठी परवानगी मागत स्थलांतरित कामगारांनी अशा पद्धतीने हिंसाचार करण्याची ही दुसरी घटना आहे.