'कोरोना कंट्रोल'साठी केंद्राचा 'कंटेन्मेंट प्लान'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 
 

महाराष्ट्रातील 'लॉकडाऊन'चा कालावधी हा आता किमान ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनापासून बचावाच्या केलेल्या सर्व उपाययोजनांची अशीच आणि यापेक्षा कडक अंमलबजावणी सुरु राहीलच. पण, सरकारच्या या उपाययोजनांवर नाहक टीकेची झोड उठवणाऱ्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, आजवर केंद्र सरकारने राबविलेल्या या सर्व उपाययोजना या जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अगदी सुसुत्र पद्धतीने अमलात आणल्या गेल्या आणि उद्दिष्टपूर्तीपर्यंत त्यांची अंमलबजावणी करणे हाच देशाला कोरोनामुक्त करण्याचा मार्ग आहे.

 

सध्या देशात थैमान घालणाऱ्या 'कोविड-१९'च्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी एक मार्गदर्शन पुस्तिका केंद्रीय स्वास्थ आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे वितरीत केली आहे Containment Plan for Large Outbreaks. Novel Coronavirus Disease २०१९. (COVID-१९). ही २० टंकलिखित पृष्ठांची मार्गदर्शक पुस्तिका आहे. तिचा सारांश आणि प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...

प्रास्ताविक

दि. ३१ डिसेंबर, २०१९ रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या चीनमधील शाखेने हुबेई प्रांतातील वुहान शहरात श्वसनाच्या आजाराचाप्रसार झाल्याची माहिती प्रसारित केली. दि. ७ जानेवारी, २०२० रोजी चिनी शासनाने या आजारास 'कोरोना व्हायरस' कारणीभूत असण्याचे निश्चित केले. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला 'सार्स- कोव-२' असे नाव निश्चित करून त्यामुळे होणाऱ्या आजारांना 'कोविड-१९' असे नाव दिले. हा साथीचा आजार आता जगातील २०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरत आहे. तसेच सुमारे १६० देशांमधून तो स्थानिक स्तरावर संसर्गजन्य साथीच्या सारखा पसरतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दि.१ एप्रिलपर्यंत या साथीच्या रोगाची लागण ८ लाख २३ हजार ६२६ लोकांना झाली असून 'कोविड-१'मुळे मृतांची संख्या जगभरात ४०,५९८ झालेली आहे.

दि. २ एप्रिल रोजी भारतात १,९६५ रुग्णसंख्या होती. (ज्यात ५० विदेशी नागरिकांचा समावेश होता आणि मृतांची संख्या ५० होती.)

दि. ११ मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने 'कोविड-१९' ही जागतिक महामारी (pandemic) असल्याचे जाहीर करूनही चीनमध्ये उद्भवलेली ही महामारी युरोप, उत्तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये अगदी वेगाने पसरली. तिच्यावर नियंत्रण आणण्यासाठी विखुरलेल्या स्वरुपात उपाययोजना न करता संपूर्ण देशात आणि केंद्रीय स्तरावर उपाययोजना करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दिल्या गेल्या. भारतातसुद्धा 'कोविड-१९'च्या साथीची लागण केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश इ. अनेक राज्यांमध्ये झाली असून एकूण २११ जिल्ह्यांमधून या साथीचा प्रसार झाल्याचे जाहीर केले आहे.

कोरोना व्हायरस

हा विषाणू मनुष्य तसेच इतर जनावरांमध्ये संक्रमण करणारा आहे. मात्र, फार कमी वेळा या विषाणूची लागण प्राण्यांमधून मानवात पूर्वी झालेली आहे. यापूर्वी २००३ मध्ये 'सार्स' आणि २०१४ 'मेर्स' या विषाणूची लागण झाली होती. 'कोविड-१९' हा विषाणू वरील दोन साथींचे रोग पसरविणाऱ्या विषाणूंसारखाच आहे. सध्या उपलब्ध माहितीप्रमाणे लागण झाल्यापासून सुमारे २ ते १४ दिवसांच्या अवधीत हा विषाणू शरीरात पसरतो. त्यानंतर तो आजाराच्या स्वरुपात प्रकट होतो. या रोगाची सर्वसामान्य लक्षणे ताप येणे, अंग गळल्यासारखे वाटणे, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होणे अशी असतात. कधी कधी सुमारे २० टक्के लोकांमध्ये घशात खवखव, अतिसार आणि मळमळ आणि उलटी होणे अशी लक्षणे दिसून येतात.

चीनमधून प्राप्त झालेल्या सध्याच्या आकडेवारीनुसार, सुमारे ८१ टक्के लोकांमध्ये लक्षणे सौम्य असतात. १४ टक्के लोकांना दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता भासते, तर सुमारे ५ टक्के लोकांवर आयसीयुमध्ये उपचार करावे लागतात आणि कृत्रिम श्वसनाची व्यवस्था करावी लागते.

भारतात साथीचा प्रसार

सध्याची भारतातील 'कोविड-१९'च्या प्रसाराची गती पाहता पाच प्रकारे त्याची साथ वाढू शकते.

) प्रवासात होणाऱ्या संपर्कामधून

) स्थानिक स्तरावर होणाऱ्या संपर्कातून

) आळा घालता येणाऱ्या साथीच्या प्रसारातून

) मोठ्या प्रमाणावर पसरू शकणाऱ्या साथीतून

) भारतात 'कोविड-१९' महामारीचे स्वरूप धारण करू शकते.

'कोविड-१९' झपाट्याने पसरू नये, यासाठी योजनाबद्ध उपाय अंमलात आणले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासावर बंधने घातली आहेत. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी येत होते, तोवर त्यांची तपासणी करण्याची व नंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्याची योजना कार्यान्वित केली गेली.

स्थानिक पातळीवर जेव्हा 'कोविड-१९'ची लागण एखाद्या व्यक्तीला झाल्याचे निश्चित झाल्यावर, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना वेगळे करुन त्यांची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच ज्यांच्या बाबतीत संसर्ग झाल्याचा संशय आहे, त्यांची विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच सामाजिक स्तरावर पुरेसे अंतर राखून आपापसातील व्यवहार करण्यावर भर देण्यात आला.

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लागण होण्याची शक्यता दिसली (Hotspot) त्या ठिकाणी वस्ती विलगीकरण करून लोकांची ये-जा करण्यावर बंधने घालण्यात आली. 'कोविड-१९'ची तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. लोकांना उपचार करून देण्यासाठी 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन' आणि इतर औषधे उपलब्ध करून देण्यात आली.

यापुढे जाऊन 'कोविड-१९'चे महामारीत रुपांतर न होऊ देता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी खालील उपाययोजनांची अंंमलबजावणी करण्यात आली.

) स्थानिक स्तरावर विलगीकरण करणे

या प्रकारात जी वस्ती विलगीकरणात ठेवली गेली, त्यात लोकांच्या येण्या-जाण्यावर बंधने घातली आहेत. तसेच लोखंडी अडथळा निर्माण केला सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

) ही योजना यशस्वी होण्यासाठी त्या भागांतील लोकांची तपासणी, संशयित व्यक्तींचे ताबडतोब विलगीकरण, त्या वस्तीत असलेल्या लोकांना आवश्यक त्या दैनंदिन गरजा आणि सामाजिक सेवा पुरविण्याची कार्यक्षम व्यवस्था, तसेच वातावरण आणि दैनंदिन तापमान यांचा समावेश असेल.

) वर दिलेल्या उपायांची त्वरेने आणि योग्यरित्या अंमलबजावणी स्थानिक प्रशासनाला करता यावी, यासाठी DM Act २००५ आणि Epidemic Diseases Act, १८९७ च्या अंतर्गत विशेषाधिकार दिले आहेत.

) केंद्रीय स्तरावर मंत्रिमंडळाची विशेष समिती कॅबिनेट सचिव स्तरावरील निरनिराळ्या खात्याचे अधिकारी, राष्ट्रीय आपदा निवारण समिती इत्यादीचा समन्वय साधून पुढील उपाययोजना ठरविण्यात येत आहेत. राज्य स्तरावर स्थानिक राज्य सरकारांना राज्यस्तरीय आपदा निवारण समित्या आणि आपत्कालीन व्यवस्थापन संयोजनातर्फे याच्या प्रसारावर आळा घालण्याची परिस्थितीनुरूप परवानगी देण्यात आली आहे.

) जिल्हास्तरावर स्थानिक जिल्हाधिकारी हे सर्व प्रकारच्या व्यवस्था आणि योजनाबद्ध नियोजनासाठी प्रमुख जबाबदार असतील. जिल्हाधिकारी आरोग्य खाते, येणाऱ्या संस्था यांच्याशी समन्वय साधून आजार पसरू नये, यासाठी उपाययोजना करतील. तसेच त्या राबविण्याची व्यवस्था करतील.

) ज्या भागात कोरोनाचा उद्रेग होण्याची शक्यता असेल, त्या भागात वैद्यकीय व इतर मदतकार्य त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी 'रॅपीड रिस्पॉन्स केंद्रा'तर्फे सज्ज करण्यात आल्या आहेत. आवश्यकता पडल्यास केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे त्यांना पाठविण्यात येईल.

) ज्या प्रदेशात विलगीकरण करण्याची आवश्यकता आहे, त्या भागात आखणी, संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कातील लोकांची यादी, त्यांची नोंदणी व विलगीकरण आणि बाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार इ. करण्यात येतील. या भागात वाहनांवर पूर्णपणे संचारबंदी घालण्यात येईल आणि निगराणीसाठी पोलीस दल तैनात केले जाईल. ये-जा करणाऱ्यांची त्वरित तपासणी करण्यासाठी रस्त्यांवर आरोग्यसेवक (Medical Workers) तैनात केले जातील.

) संसर्गबाधित तसेच संशयित रुग्णांच्या रक्त तपासणीचे नमुने त्वरित तपासता यावेत, यासाठी देशात ठिकठिकाणी तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यांच्याकडून काही तासांतच चाचणीचे परिणाम प्राप्त करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या केंद्रांनी त्यांच्याकडे आलेल्या नमुन्यांची दर दिवशीची संख्या, तपासलेल्या नमुन्यांची संख्या आणि बाधित रुग्णांची निश्चिती झाल्याची संख्या ही राज्य स्तरावर तसेच केंद्रीय स्तरावर देणे बंधनकारक असेल. ते कसे करायचे, याची कार्यपद्धती तपासणी केंद्रांना दिली आहे.

. बाधित तसेच संशयित रुग्णांना दवाखान्यात प्रवेश देऊन त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुरुप त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. काही दवाखाने केवळ 'कोविड-१९'च्या रुग्णांसाठी वेगळे काढले जातील. या दवाखान्यांमधून कृत्रिम श्वासोच्छवास उपकरणे तसेच आपत्कालीन वैद्यकीय मदतीच्या सुविधा उपलब्ध असतील. खासगी दवाखान्यामधूनही 'कोविड-१९' बाधित रुग्णांना ठेवले जाईल. रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्णावाहिका उपलब्ध केल्या जातील.

१०. रुग्णांची पाहणी आणि सेवासुश्रुषा करण्यात गुंतलेल्या मनुष्यबळाला, सेवाकर्त्यांना बाधित होण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना जंतुनाशके, वारंवार हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि दवाखान्यातून तयार होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची योग तऱ्हेने विल्हेवाट लावण्यावर खास लक्ष देण्यात येईल.

११. या आणीबाणीसदृश विलगीकरणाच्या काळात एकटेपणा वाढून अनेकांना मानसिक ताण येऊ शकतो. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढील संकेतस्थळावर मार्गदर्शन मिळू शकेल. https://www.mohfw.gov.in/pdf / Minding our minds during Coronaeditedat.pdf

१२. ज्यांचा बाधित रुग्णांशी संपर्क आला आहे, पण त्यांना रोगाची लक्षणे दिसत नाही, अशांसाठी घरातच विलगीकरण करून त्यांच्यावर काही काळ लक्ष ठेवण्याची जबाबदारी कुटुंब सदस्यांनी घ्यायची असून इतर सदस्यांनी काय काळजी घ्यायची यांच्या सूचना आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

१३. या रोगाचा सार्वजनिक प्रसार होऊ नये, यासाठी शाळा-महाविद्यालये तसेच कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.लोकांनी घराबाहेर अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, यासाठी प्रत्यक्ष तसेच माध्यमांमधून वारंवार सूचना प्रसारित करण्यात येत आहेत. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे आणि अंतर राखून व्यवहार करावेत. बाहेर पडताना तोंडावर आवरण घेऊनच बाहेर पडावे, याबाबत प्रचार केला जाईल. सर्व सार्वजनिक वाहने, बस, रेल्वे इ. बंद केल्या जातील. फक्त रुग्णांना ने-आण आणि आवश्यक सेवा कर्मचारी यांना येण्या-जाण्याची परवानगी असेल.

१४. या रोगाच्या साथीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ लागेल. त्यांना प्रशिक्षित करण्यावर भर देण्यात येईल. त्यात लोकांपर्यंत पोहोचून सर्वेक्षण करणे, दवाखान्यातील सेवा शुश्रूषा, वैद्यकीय नमुने तपासणी व पुरवठा व्यवस्था इ. बाबतच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव असेल.

१५. 'कोविड-१९'चा प्रसार रोखण्यासाठी तसेच सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य पुरवठा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर आर्थिक मदत आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. ' NHM Flexi fund' आणि गृहमंत्रालयातर्फे 'SDRF' फंडातून आर्थिक मदतीची व्यवस्था करण्यात येईल.

- डॉ. प्रमोद पाठक

@@AUTHORINFO_V1@@