'ईपीएफओ'तर्फे दिलासा ! : १० दिवसांत प्रकरणे निकाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2020
Total Views |
EPFO_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि कार्मिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने कोविड१९ शी लढा देण्याच्या कार्यात लाभार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी EPF म्हणजे भविष्य निर्वाह निधीच्या नियमात दुरुस्ती करुन, विशेष तरतुदीअंतर्गत, देशभरातील सुमारे १.३७ लाख दावे त्वरित म्हणजे १० दिवसांच्या आत निकाली काढले आणि २७९.६५ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला.
 
 
या निधीचे वितरण देखील सुरु झाले आहे. सध्या या प्रणालीअंतर्गत केवायसी पूर्ण असलेल्या सर्व दाव्यांची पडताळणी केवळ ७२ तासात केली जात आहे. ज्या सदस्यांनी इतर कोणत्या कारणासाठी हा निधी काढण्याचा दावा केला आहे, ते देखील, या आजाराच्या मुकाबल्यासाठी नव्याने दावा करु शकतात. प्रत्येक सदस्याच्या दाव्याची केवायसी नियमांना अनुसरुन ते दावे त्वरित निकाली काढले जात आहे.
 
 
 
कोविड-१९ च्या आजाराचा सामना करण्यासाठी सरकारने ईपीएफ योजने अंतर्गत पैसे काढण्याची विशेष तरतूद केली आहे. ही तरतूद पीएमजीकेवाय योजनेचा भाग असून, यासंदर्भात २८ मार्च २०२० रोजी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार, तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता याची मर्यादा निश्चित करण्यात आली असून या खात्यात जमा असलेल्या एकूण रकमेपैकी ७५ टक्यांपर्यतची रक्कम दिली जाते. ही आगावू रक्कम असल्याने या रकमेवर कर कापला जात नाही.
 
 
या रकमेची मागणी होऊ शकेल, याचे पूर्वानुमान करत EPFO ने एक नवे सॉफ्टवेयर विकसित केले आहे, त्यामुळे ही संपूर्ण प्रकिया जलद आणि कागदरहित होऊ शकते. मात्र, हे दावे निकाली काढण्यासाठी, सदस्याचे खाते केवायसी संपूर्ण असणे आवश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@