तब्लीगींमुळेच धारावी बनले कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

    10-Apr-2020
Total Views | 71

dharavi_1  H x



धारावीत सापडलेल्या ५ रुग्णांपैकी २ तब्लीगी; तब्लीगींमुळे धारावीत वाढला कोरोनाचा आकडा


मुंबई : धारावीत सापडलेल्या ५ रुग्णांपैकी २ जण हे दिल्लीच्या मरकज कार्यक्रमाला हजेरी लावून आल्याची माहिती समोर आली आहे.  दिल्लीच्या तब्लीग-ए-जमातमध्ये सहभागी झालेले लोक मुंबईतील धारावीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून त्यांना खबरदारी म्हणून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील २ जणांचे तपासणी नमुने शुक्रवारी पॉझिटिव्ह आले असून, या नवीन रुग्णांमुळे धारावीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढला आहे. धारावीत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या घरात हे तब्लीगी राहत असल्याचे समोर आले होते.


दरम्यान, आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या धारावीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. धारावीत रुग्ण वाढत असतानाही परिसरातील मार्गावर भाजीपाला, फळे आदी बाजार सुरू होते आणि खरेदीसाठी लोकांची गर्दी होते होती. त्यामुळे संसर्ग अधिक वाढू नये यासाठी धारावीतील काही महत्वाचे मार्ग बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला.


येथे रोज नवे रुग्ण सापडत असून आकडेवारी वाढते आहे. बलिगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर, मदीना नगर, ज्ञानवाडा चाळ, मुस्लीम नगर, सोशल नगर, जनता सोसायटी या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हे परिसर हाय रिस्क म्हणून जाहीर करण्यात आले असतानाही या मार्गावर भरणारे बाजार रोज गजबजलेले असायचे. बाजार भरण्याच्या मार्गापासून काही अंतरावरच कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. वाढत्या गर्दीमुळे संसर्ग अधिक वाढण्याचा धोका असल्याने प्रतिबंधित क्षेत्राच्या मार्गावरील सर्व बाजार, किराणा मालाची दुकाने बंद केली जाणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121