मशिदीत 'जमात'कडून पोलिसांवर दगडफेक-गोळीबार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |


bihar police_1  


दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये 'तब्लिग-ए-जमात'मध्ये सहभागी झालेले अनेक जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीला विरोध


बिहार : दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये 'तब्लिग-ए-जमात'मध्ये सहभागी झालेले अनेक जण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर देशातील आणखीही काही मशिदीत अशाच पद्धतीच्या जमात बैठक पार पडल्याचे समोर आल्याने प्रत्येक राज्यातील पोलीस मशिदींमध्ये जाऊन माहिती घेत आहे. अशाच एका सूचनेच्या आधारावर मंगळवारी रात्री उशिरा मधुबनी पोलीस एका मशिदीत तपासासाठी दाखल झाले होते. यावेळी, मशिदीत उपस्थित असलेल्या जमातीच्या लोकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. इतकेच नव्हे तर या लोकांकडून पोलिसांवर गोळीबारही करण्यात आला. त्यामुळे, पोलिसांना आपला जीव वाचवण्यासाठी इथून बाहेर पडावे लागले. हल्लेखोरांनी यावेळी पोलिसांच्या एका गाडीची तोडफोड करत तिला एका तलावात ढकलून दिले.



दरम्यान मधुबनीचे पोलीस अधिक्षक डॉ. सत्यप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार
, मंगळवारी रात्री बिहारमध्ये तब्लिग-ए-जमात'च्या चौकशीसाठी मशिदीत घुसलेल्या पोलिसांवर स्थानिकांकडून गोळीबार आणि दगडफेक करण्यात आली. या मशिदीत जमातीच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र जमल्याची बातमी मिळाल्यानंतर पडताळणीसाठी पोलीस इथे पोहचले होते.' दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर ४ जणांना अटक करण्यात आलीय. या मशिदीत काही परदेशी नागरिक देखील उपस्थित आहेत.त्यांची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@