यांचे काय करायचे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |
Tablig e Jamat _1 &n
 


मुस्लिमांच्या बेजबाबदारपणामुळे ‘कोरोना’ फैलावाचा सर्वोच्च धोका




नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : एकीकडे संपूर्ण जग कोरोना प्रकोपाचा सामना कऱण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्ली येथे ‘तबलिगी जमात‘ या मुस्लीम धर्मीयांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी विविध देशांतून जवळपास १७०० धर्मप्रसारक एकत्र जमून धार्मिक कार्यक्रम करीत होते. धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाची लागण झालेली असतानाही त्यांनी काश्मीरपासून अंदमानपर्यंत प्रवास करीत तेथेही कोरोनाचा फैलाव केला आहे. एकीकडे हिंदूंची धार्मिक स्थळे बंद असताना तबलिगी-ए-जमातचा बेजबाबदारपणा पाहता काहींना मानवतेपेक्षाही धर्मच मोठा वाटत असल्याचे सिद्ध झाले आहे.

 

देशातील राजधानी दिल्ली येथे निझामुद्दीन परिसरात मुस्लीम धर्मीयांच्या तबलिगी-ए-जमातच्या मुख्यालयात सुमारे १५०० ते १७०० मुस्लीम धर्मगुरू एका धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्रित जमले होते. यासाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही धर्मगुरू उपस्थित होते. एकीकडे संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केलेले असताना आणि परस्परांच्या संपर्कात येऊ नये, अशा सूचना दिलेल्या असताना दिल्लीत तबलिगी-ए-जमात मात्र जगभरातून आलेल्या मुस्लीम धर्मीयांना एकाच इमारतीत ठेवून धार्मिक कार्यक्रम करीत होती.

 

विशेष म्हणजे, एकाच वेळी एवढे लोक एकत्र जमले आहेत, याची माहिती दिल्ली राज्य सरकारला नव्हती. तेथे आलेल्या एका ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली आणि दिल्लीसह देशभरात एकच खळबळ माजली. तेथे उपस्थित असलेल्या ३३ जणांना तत्काळ दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले आणि त्यापैकी तब्बल २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री डॉ. सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. तबलिगीच्या इमारतीमधून आतापर्यंत १०३३ जणांना बाहेर काढण्यात आले असून संपूर्ण परिसर निर्जंतुक (सॅनिटाईझ) करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तेथे असलेल्या ३३४ जणांना रुग्णालयात तर जवळपास ७०० जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

अंदमानपर्यंत झाला कोरोनाचा फैलाव

तबलिगी-ए-जमातच्या मुख्यालयात जमलेल्या मुस्लीम धर्मीयांनी देशातील विविध राज्यांमध्येही प्रवास केल्याचे उघड झाल्यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी असलेल्या आतापर्यंत नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी काश्मीरपासून अंदमानपर्यंत प्रवास केल्याने तेथेही कोरोना पोहोचला आहे. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातून ११५ जण कार्यक्रमात उपस्थित होते. त्याचप्रमाणे तामिळनाडू ५०१, आसाम २१६, मध्य प्रदेश १०७, उत्तर प्रदेश १५६, पश्चिम बंगाल ७२, अंदमान २१, बिहार ८६, हरियाणा २२, हिमाचल प्रदेशातील १५, हैदराबाद ५, कर्नाटक ४५, मेघालय ५, केरळ १५, ओडिशा १५, पंजाब ९, झारखंड ४६, उत्तराखंडमधील ३४ नागरिक सहभागी झाले होते.

 

‘तबलिगी’चा बेजबाबदारपणा

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार २१ मार्च रोजी हझरत निझामुद्दीन येथील इमारतीत १७४६ जण वास्तव्यास होते. त्यापैकी १५३० भारतीय तर २१६ परदेशी नागरिक होते. त्यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश आणि किरगिझस्तानमधील लोक सहभागी झाले होते. त्यासोबतच २१ मार्च रोजीच अन्य ८२४ परदेशी मुस्लीम देशभरात धर्मप्रचाराचे काम करीत होते, त्यांच्यासोबत तबलिगीचे भारतीय धर्मप्रचारकही कार्यरत होते. पोलिसांनी २८ मार्च रोजी विविध राज्यांतील अशा २१३७ धर्मप्रचारकांची ओळख पटवली होती आणि केंद्रीय गृहखात्याने आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना जारी केल्या होत्या. जानेवारीपासून तबलिगीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी जगभरातून २१०० जणांनी निझामुद्दीन येथील मुख्यालयास भेट दिली. त्यापैकी ८२४ जण (२१ मार्च रोजीपर्यंतची स्थिती) देशात विविध ठिकाणी धर्मप्रचारासाठी गेले, २१६ जण दिल्लीतच थांबले तर अन्य लोकांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर होण्यापूर्वीच देश सोडला असावा, असा कयास आहे.



@@AUTHORINFO_V1@@