पाकिस्तानातील हिंदूंना शाहिद आफ्रिदीने केले अन्नदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |


shahid afridi_1 &nbs


इस्लामाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगभरात थैमान घेतले आहे. या कठीण प्रसंगातही पाकिस्तानमधील इम्रान खान यांनी पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्यांकांना रेशन धान्य देण्यास नकार दिला होता.  यानंतर मात्र, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिदी आफ्रिदीने कराचीतील व आपल्या परिसरातील हिंदू व ख्रिश्चन अल्पसंख्यांक गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मोफत अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचे मोफत वाटप केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहिदी आफ्रिदी आपल्या सामाजिक संस्थेद्वारे हे दान करत आहे.





आफ्रिदी सध्या आपल्या संस्थेद्वारे गरजू व्यक्तींसाठी ‘डोनेट करो ना’ हे अभियान चालवतो आहे. या अभियानाअंतर्गत आफ्रिदीने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींना अन्नदान केले. आफ्रिदीने आपल्या या मदतकार्याचे फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.भारतीय क्रिकेट विश्वातून आफ्रिदीच्या कामाचे कौतुक होत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांनीही आफ्रिदीच्या या कामाचे कौतुक केले आहे. संपूर्ण जग खडतर परिस्थितीतून जात असताना आफ्रिदीचे काम कौतुकास पात्र आहे.असे हरभजन आणि युवराज सिंग काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात हिंदू व्यक्तींना रेशनवर धान्य मिळत नसल्याचे वृत्त होते. मात्र आफ्रिदीने या खडतर काळात धर्माचा विचार न करता माणुसकीला महत्व देत एक वेगळे उदाहरण घालून दिले आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@