निजामुद्दीन येथील कार्यक्रमात नाशिकचेही नागरिक सहभागी,शोधमोहीम सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |


nashik news_1  




नाशिक : दिल्ली मधील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील ही काही नागरिक गेल्याचे आणि पुन्हा परत आल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्या नुसार तपासणी करण्यात आली असता दिल्ली येथे गेलेले व दिल्ली येथून नाशिकमध्ये परत आलेले व त्यांच्या संपर्कात आलेले असे एकत्रित मिळून २१ नागरिक आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे. तसेच अजून कोणी नागरिक दिल्लीवारी करून आले आहेत काय, व त्यांच्या संपर्कात कोणी आले काय याचा शोध प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. तसेच निजामुद्दीन येथे गेलेल्या नागरिकांनी स्वतः समोर येऊन प्रशासनाला माहिती देण्यासह मदतीचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

 
 

निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोना ची लागत झाल्याचे उघड झाले आहे. देशातील तब्बल 24 राज्यातील नागरिकांचा या कार्यक्रमात सहभाग होता. हे नागरिक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये परतले आहे. त्यांच्या माध्यमातून स्थानिक इतर नागरिकांना करुणा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या नागरिकांवर त्वरित उपचार होणे गरजेचे असून त्यासाठी संबंधितांनी समोर येणे गरजेचे आहे प्रशासनाने आपली माहिती देणे गरजेचे आहे पोलीस आरोग्य विभाग महसूल विभाग आपापल्या परीने या सर्वांची माहिती एकत्रित करीत आहे नाशिक मधूनही या कार्यक्रमांमध्ये मालेगाव मधून काही नागरिक सहभागी झाल्याची शक्यता असून प्रशासन सर्वांचा शोध घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पुढे येत आरोग्य यंत्रणेला आपल्याबद्दलची माहिती देणे अत्यंत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@