मुंबईत पालिकेचे आता 'फिव्हर क्लिनिक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |


fever clinik _1 &nbs


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची धोका लक्षात घेऊन भीतीपोटी खासगी डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत. यामुळे प्राथमिक उपचार करण्यासाठी पालिकेने संपूर्ण मुंबईत 'फिव्हर क्लिनिक' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोना सदृश्य आजाराची लक्षणं आढळल्यास येथेच या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. या क्लिनिकमध्ये फक्त ताप, सर्दी आणि खोकल्यावर उपचार करण्यात येणार असल्याचं महापालिकेने सांगितले.



मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवक व महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी खासगी डॉक्टरांनी क्लिनिक बंद ठेवले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे इतर प्राथमिक उपचारांसाठी नागरिकांची गैरसोय होत असल्याने खासगी दवाखाने
, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोअर्स खुले ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून ताप, सर्दी, खोकला आदी आजारांसाठी फिव्हर क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.



मुंबईतल्या २४ वॉर्डांमधील विविध ठिकाणी हे क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. करोनाची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींवर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येतील. तर
'कोविड कोरोना १९' ची लागण झाल्यासारखी लक्षणे असणाऱ्या, म्हणजेच 'ताप - सर्दी - खोकला' असणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेच्या दवाखान्यात किंवा महापालिकेच्या रुग्णालयात अथवा महापालिकेने 'कोरोना‌' विषयक उपचारांसाठी प्राधिकृत केलेल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येतील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@