मुंबईची चिंता वाढली ! धारावीत पहिला कोरोनाबाधित रुग्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |

dharavi_1  H x

राज्यात ३३५ कोरोनाबाधित ; नव्या ३३ रुग्णांची वाढ

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत १ जण कोरोनाबाधित आढळला असून त्यांच्या कुटुंबातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र धारावीत रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
धारावी ही मुंबईतील सर्वात दाटीवाटीची वस्ती असलेली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. घराला घर खेटून असल्याने येथे आजार पसरल्यास तो आटोक्यात आणणे कठीण असते. मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दी टाळणे हे दोनच पर्याय असलेल्या आजाराने धारावीत शिरकाव केल्याने येथे त्याला प्रतिबंध कसा करायचा याची चिंता प्रशासनाला आणि शासनाला भेडसावते आहे.
 
वरळी कोळावाडा झोपडपट्टीत शिरण्याचा आणि बाहेर पडण्याचा एकच मार्ग असल्याने तो सील करणे पोलिसांना सोपे गेले. बिंबिसार नगर वसाहतही मध्यम उच्चभ्रूंची वस्ती असल्याने आणि हायवेलगत असल्याने त्या वसाहतीचा बंदोबस्त करणे कठीण गेले नाही. मात्र धारावीत हजारो वाटा असल्याने ही झोपडपट्टी सील कशी करायची आणि आजाराला प्रतिबंध कसा करायचा याची चिंता प्रशासनाला भेडसावते आहे.
 
राज्यात २४ तासात कोरोनाबाधित ३३ रुग्णांची वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात ३०२ रुग्ण होते. तर बुधवारी ही संख्या ३३५ झाली आहे. पैकी मुंबईत रुग्णांची संख्या १९७ झाली आहे. तर पुण्यात ५० रुग्ण आढळले आहेत. राज्यात मृतांची संख्या १२ झाली असून त्यापैकी ९ मुंबईत मृत्यू पावले आहेत. बुधवारी पालघरमध्ये एका ५० वर्षीय रुग्णाचा, तर मुंबईत एका ७५ वर्षीय वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र ३९ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, ही समाधानाची बाबत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@