रात्री दोन वाजता अजित डोवालांनी फत्ते केली मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |


ajit doval_1  H



रात्री दोन वाजता अजित डोवाल यांनी मशीद रिकामी करायचे मिशन पूर्ण केले


नवी दिल्ली : दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना साद यांनी जेव्हा दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत बंगलेवाली मशीद रिकामी करण्यास नकार दिला तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना तात्काळ तिथे पोहोचून तोडगा काढण्यास सांगितले.



एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितानुसार
, अजित डोवाल २८-२९ मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मरकजमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी मौलाना साद यांची मनधरणी करत मशिदीमधील सर्वांची करोना चाचणी करण्यासाठी आणि क्वारंटाइन करण्यासाठी तयार करण्यात आले.अजित डोवाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर मरकजने १६७ तब्लिकी कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. अजित डोवाल यांनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक देश आणि विदेशातील अनेक मुस्लीम संघटनांशी चांगले संबंध निर्माण केले आहेत. देशाचे धोरण ठरवताना अनेकदा अजित डोवाल या संघटनांशी चर्चाही करतात. परदेशी नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केले होते का याचीही पाहणी केली जात आहे. पण सुरक्षा यंत्रणांसमोर कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची माहिती मिळवून त्यांची करोना चाचणी करण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे.


मरकजमधील कोरोनाबाधित रुग्णाची धक्कादायक आकडेवारी समोर येत असताना देखील मशीद रिकामी करण्यास नकार येत असल्याकरणाने ही पाऊले उचलली गेली. 
सुरक्षा अधिकारी सध्या मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती घेत असून त्यांची वैद्यकीय चाचणी होईल याची काळजी घेत आहेत.या कार्यक्रमात एकूण २१६ परदेशी नागरिक उपस्थित होते. इतकेच नाही तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील एकूण ८०० नागरिक उपस्थित होते. देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे केंद्रस्थान ठरलेल्या निजामुद्दीन मरकजमधील एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही' अशा आशयाचे विधान मौलवी करताना या क्लिपमध्ये आढळले. या धार्मिक सोहळ्यात उपस्थित लोक देशातील वेगवेगळ्या भागात लपून बसल्याचे प्रकरणेदेखील मिळाली यांनतर कडक कारवाई करत मरकजचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. 

@@AUTHORINFO_V1@@