मरकझ कार्यक्रमातील ‘ते’ लोक नाशिकमध्ये क्वारंटाइन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |

nashik_1  H x W
 
 
नाशिक : देशभरामध्ये कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अशामध्ये दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलीग जमातीच्या आंतरराष्ट्रीय मुस्लीम धार्मिक सोहळ्यामध्ये हजारो लोकांचा समावेश होता. यामध्ये काही नाशिकच्या नागरिकांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली की, “नाशिकमधून दिल्लीत गेलेल्या २१ जणांपैकी १६ जणांची माहिती मिळाली असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.”
 
 
 
तसेच यासंदर्भात “शहरासह जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाची चार पथके पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवित आहेत. बुधवारी संध्याकाळपर्यंत निश्चित आकडा समोर येईल,” असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सुमारे ५० लोक या सोहळ्याला गेले असावे, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यापैकी १६ लोकांना आरोग्य विभाग व पोलिसांनी शोधून काढले आहे. काहींना घरांमध्ये तर काहींना आरोग्य विभागाच्या कक्षात वेगळे ठेवले जात आहे अशी माहिती देण्यात येत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@