विदेशात वापरलेल्या ‘त्या’ कोरोना मास्क विक्रीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2020
Total Views |

used corona mask_1 &
 
 
 
ठाणे : कोरोनामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली असून भारतातही या रोगाने शिरकाव केला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार सुरू झाला असतानाच कोरोनाच्या दहशतीचा फायदा घेत परदेशात वापरलेले मास्क मुंबई व ठाणेकरांना विकण्याचा भयंकर डाव भिवंडीत उघडकीस आला आहे. हे वापरलेले लाखो परदेशी मास्क धुऊन पुन्हा पॅकिंग करण्याचे काम एका गोदामात सुरू असतानाच गावकऱ्यांनी पोलिसांसह छापा मारल्याने या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला आहे.
 
 
 
ही बाब एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले होते. याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांनी रविवारी दुपारच्या सुमारास गोदामावर छापा टाकून शेकडो गोण्यामधील मास्कचा पर्दाफाश केला आहे. भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथील परसनाथ कंपाऊंड येथे हा फसवणुकीचा धंदा चालू होता. व्हायरल व्हिडिओचे गांभीर्य ओळखून भिवंडीचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी व्हिडिओची तपासणी केली. त्यांना हा प्रकार भिवंडी पोलीस परिमंडळ २ च्या हद्दीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ७ मार्च रोजी संबंधित गोदामावर कारवाई करण्यासाठी लेखी पत्र पाठवेल होते.डॉ. मनीष रेंगे यांंच्या आरोग्य पथकाने पोलीस बंदोबस्तात गोदामावर छापेमारी करीत शेकडो गोण्यामधील माक्सचा विल्हेवाट लावली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@