गोड्या पाण्याची परिसंस्था आणि जैवविविधता धोक्यात; जागतिक संघटनांचा अहवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2020   
Total Views |
wetland_1  H x



पाच दशकांमध्ये गोड्या पाण्याची ३० टक्के परिसंस्था आणि त्यामधील ८३ टक्के प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर पोहोचल्या आहेत

 
 


मुंबई (अक्षय मांडवकर) -
  नद्या, तलाव आणि पाणथळींमधील जैवविविधता वेगाने नामशेष होत आहे. अशा परिस्थितीत निसर्ग संवर्धनामध्ये काम करणाऱ्या जगातील नामांकित संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या एका शास्त्रीय शोधनिबंधामध्ये या परिक्षेत्रातील अधिवास पूर्ववत करणाऱ्या योजनांची रुपरेषा मांडण्यात आली आहे. 'आॅक्सफर्ड अकॅडमी जनरल'मधील 'बायोसायन्स' या विभागात नुकताच हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. यामध्ये सांगितल्याप्रमाणे, १९७० पासून गोड्या पाण्याची ३० टक्के परिसंस्था आणि त्यामधील ८३ टक्के प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर पोहोचल्या आहेत. गोड्या पाण्याची परिसंस्था मानवजातीला पाणी, अन्न आणि रोजगार उपलब्ध करुन देतच. मात्र, त्या पलीकडे जाऊन पूर, दुष्काळ आणि वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण करते. या परिसंस्थेने पृथ्वीच्या भूपृष्ठावरील एक टक्के जागा व्यापलेली आहे. जगात आढळणाऱ्या माशांच्या प्रजातींपैकी १० टक्के प्रजातींचे अधिवास हा नदी, तलाव आणि गोड्या पाण्याच्या पाणथळ जागांमध्ये आहे. मात्र, या प्रजाती आता वेगाने नष्ट होत आहेत. यामध्ये नद्यांमधील डाॅल्फिन, स्टर्जन मासा, बीव्हर, मगर आणि कासवांचा समावेश आहे.
 
 
 
 
 
गोड्या पाण्याची ही संपूर्ण परिसंस्था ढासळत असल्याचा अभ्यास 'वर्ल्ड वाईल्डलाईफ फण्ड' (डब्लूडब्लूएफ),' इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर', 'काॅन्झर्वेशन इन्टरनॅशनल आणि कारडीर्फ युनिव्हर्सिटी'च्या संशोधकांनी केला आहे. या संशोधकांच्या मते, जमीन आणि महासागरमधील जैवविविधता नष्टतेच्या दोन ते तीन पट वेगाने गोड्या पाण्यातील जैवविविधता नामशेष होत आहे. जैविक विविधतच्या संवर्धनासाठी यंदा नोव्हेंबर महिन्यात जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जैवविविधतेचे संवर्धन आणि तिचे पुनर्संचयन करण्यासाठी तयार केलेल्या जागतिक योजनांचा करारावर सहमती दर्शवण्यासाठी विविध देशांची बैठक पार पडणार आहे. या शोधनिबंधाच्या लेखकांकडून या योजनांकरिता काही उपाययोजना सुचविण्यात आले आहे. त्यानुसार येत्या काही वर्षांमध्ये नदीच्या पाण्याचे प्रवाह पूर्ववत करणे, बेकायदेशीर आणि अनियमित वाळू उत्खनन नियंत्रित करणे आणि गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायांचे व्यवस्थापन सुधारणे.

@@AUTHORINFO_V1@@