
आणखी एक दहशतवादी लपल्याची माहिती; सुरक्षादला कडून सर्च ऑपरेशन जारी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकी दरम्यान दोन दहशतवादी ठार झाले आहेत. अजूनही काही दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना दिली. चकमकीत सुरक्षादलाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र शोपिया भागात अद्यापही चकमक सुरू आहे.
सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या रेबान भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर इथे घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. या दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून प्रत्यूत्तर देण्यात आले आणि चकमकीला सुरूवात झाली.
गोळीबार अद्याप सुरू आहे. या भागात सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशनही सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ऑपरेशन सुरू असल्याने अफवा पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून शोपिया भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.