भारतभूषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


bharat bhushan tyagi_1&nb



२०१९सालच्या
‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित बुंदेलखंडच्या भारत भूषण त्यागी यांच्याविषयी माहिती देणारा हा लेख. या प्रगतशील शेतकर्‍याने ८० हजारांहून अधिक शेतकर्‍यांना ‘प्रॉडक्शन मॅनेजमेंट’ शिकवत, सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले आहे !



आज आपण शेती क्षेत्राची परिस्थिती पाहिली आणि शेतकर्‍यांशी चर्चा केली तर १०० पैकी ९० शेतकरी शेतीला आजच्या काळातील तोट्याचा व्यवसाय आहे
, असेच म्हणतील. शेतीसाठी खर्च जास्त आणि नफा कमी, अशी आजची परिस्थिती. जे पीक येते त्याचे योग्य खरेदीदार आणि मूल्य मिळत नाही, अशावेळी भारतभूषण त्यागी हे शेतकर्‍यांना बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कसे? त्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. शेतकरी व शेतकी प्रशिक्षक भारत भूषण त्यागी यांच्या मते, प्रगतशील शेतकरी होण्यासाठी प्रामुख्याने पाच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पहिले उत्पादन, दुसरी प्रक्रिया, तिसरे प्रमाणपत्र, चौथे बाजार या चार महत्त्वपूर्ण गोष्टींखेरीज पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा घटक जे समजून घेणे महत्त्वाचे आहे ते म्हणजे निसर्ग. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून भारतभूषण त्यागी मिश्र शेतीतून एका वर्षात किमान १० ते १२ पिके घेतात, ज्याचे उत्पन्न सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या उत्पन्नाच्या चौपट आहेत. जाणून घेऊया ‘पद्मश्री’ भारत भूषण त्यागी संबंधित काही खास गोष्टी.



bharat bhushan tyagi_1&nb



२०१९ साली
‘पद्मश्री’ हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान मिळविणारे भारतभूषण हे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील आहे. दिल्लीपासून केवळ ८० किलोमीटर अंतरावर बुंदेलशहर जिल्ह्यात बिहट या छोट्या गावात राहणारे ६५ वर्षीय भारत भूषण त्यागी यांनी सेंद्रीय शेती करत स्वतःची एक नवी ओळख बनवली. त्यांनी १९९७ मध्ये सेंद्रीय शेतीला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांची खेड्यात शेती होती. आयुष्यातील अनेक आव्हानांवर मात करत भारतभूषण यांनी शेती व पर्यावरण यासंबंधित पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना निसर्गातील लहानात लहान घटकाची माहिती घेण्याचा, निसर्ग समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. निसर्गाचे बदल लक्षात घेऊन त्यांनी शेतीत सेंद्रीय शेतीची तत्त्वे लागू केली आणि हळूहळू त्याचे फायदे त्यांना दिसू लागले.

 



भारत भूषण त्यागी म्हणतात की
, देशात एक मोठा वर्ग आहे ज्याला चांगल्या आरोग्यासाठी चांगले अन्नपदार्थ खाण्याची इच्छा आहे. आपण सहजतेने पारंपरिक पद्धतीने शेती करत असाल तर ते ग्राहक सहज आपल्यापर्यंत पोहोचतील. मला माझे उत्पादन विकण्यात कधीच अडचण आली नाही. मीदेखील तेच पिकवतो जे इतर शेतकरी पिकवतात, मला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मी शेतात घेतो. भाज्या-फळे ही पिके रोज पैसे मिळवून देतात तर मग काही पिके एका महिन्यासाठी पैसे देतात. बागकाम आणि लाकूड झाडे एक-दोन वर्षांनी नफा देतात. परंतु, तो सामान्य पिकांच्या तुलनेत बर्‍याच वेळा अधिक असतो.



bharat bhushan tyagi_1&nb




भारत भूषण शेतकर्‍यांच्या हितासाठी उत्पादन व्यवस्थापनाशी संबंधित विनामूल्य कार्यशाळा घेतात
, ज्यात ते शेतकर्‍यांना शेतीशी निगडित गोष्टी नि:शुल्क शिकवतात. यामुळे शेतकर्‍यांना रासायनिक पदार्थांचा वापर न करता दुप्पट उत्पन्न मिळू शकेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते आणि त्यांना गरिबीतून मुक्त होण्यास मदत करते. अनेक लोक व शेतकरी या उपक्रमात त्यांना मदत करतात. या कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत ८० हजारांहून अधिक शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. भारतभूषण म्हणतात, “भारतातील शेतकरी खूप प्रामाणिक आहे. परंतु, त्याचे शोषण झाले आहे. या शोषणामुळे आपली जीवनशैली आणि अन्नाची पातळी दिवसेंदिवस कमी होत गेली. आपल्या देशात शेतीमध्ये विविधता दिसून येते, म्हणून जर आपण शेतकर्‍यांना आधार दिला तर आपला देश बर्‍याच अंशी आंतरराष्ट्रीय कीर्तीवर पोहोचेल.”

 



गेल्या वर्षी भारतभूषण त्यागी यांना
‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले होते आणि ते म्हणतात की, “सरकारने दिलेल्या सन्मानाला स्वत:चा एक सन्मान आहे. पण माझ्या मते, हा सन्मान म्हणजे समाजाप्रति माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. देशाबद्दलच्या माझ्या जबाबदारीला आता नाव मिळाले आहे, म्हणून मी या सन्मानाच्या दुप्पट काम करत या सन्मानाचा मान वाढविण्याचा प्रयत्न करेन. आपले भविष्य केमिकलमुक्त करून निरोगी आयुष्य जगूया.” या आशेने आपण देशातील शेतकर्‍यांना मदत केली पाहिजे. भारतभूषण त्यागींच्या या कामाला जर तुम्हाला हातभार लावायचा असेल तर ८७५५४४९८६६ वर संपर्क साधून त्यांच्या मोहिमेचा तुम्ही एक भाग बनू शकता.



भारत भूषण म्हणतात
, “केंद्र सरकारने देशातील सेंद्रीय शेतीला चालना दिली आहे. भारत कृषी व खाद्य परिषदेने ही योजना सुरू केली आहे. शेतीचे स्वरूप आणि हवामान पाहता तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. सेंद्रीय शेती शेतकर्‍यांना भरघोस कृषी उत्पन्न मिळवून देते. प्रक्रिया, प्रमाणपत्र, विपणन समजून घेतल्यास शेतकर्‍यांना कुठेही नोकरी करण्याची गरज नसते.” याआधीही भारतभूषण यांना केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन्मान मिळाला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्तेही त्यांना सन्मान मिळाला आहे. ते म्हणतात, “आपल्या देशात शेती हा तोट्याचा सौदा कसा झाला? जेव्हा मी हा विचार केला तेव्हा मला आढळले की, शेती आणि शेतकरी पूर्णपणे बाजारावर अवलंबून आहेत. शेतीचा सर्व खर्च बाजारातून आला, बाजार ही वस्तू विकत घ्यायचा, बाजारानेच त्याची किंमत निश्चित केली. शेतकर्‍यांच्या स्थितीचे मूल्यांकन करा, पीक येण्यापूर्वीच तो बाजारात आहे, पीक आल्यानंतरही तो बाजारात आहे आणि कुटुंब चालवायला बाजारातच आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठा शेतीवर अधिराज्य गाजवू लागली. बाजारपेठेतील नियम म्हणजे कमी पैसे देऊन अधिक मिळविण्याची प्रवृत्ती, ज्यामुळे आपल्या शेतकर्‍यांचीही दुर्दशा होते. अशा परिस्थितीत संपूर्ण तोडगा काढण्याची गरज होती. ज्यासाठी आम्ही ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला.” नैसर्गिक बदलांचा अभ्यास करून सेंद्रीय शेतीचा पर्याय स्वीकारत देशभरातील हजारो शेतकर्‍यांना उभारी देणार्‍या ‘पद्मश्री’ भारत भूषण त्यागी यांना पुढील योगदानासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@