भारतीय ‘नारी’ सगळ्यात भारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2020
Total Views |
Sonia Syngal_1  




आणखी एका जागतिक कंपनीच्या सीईओ पदी ‘ही’ भारतीय महिला विराजमान!


अमेरिका : जगभरातील दिग्गज कंपन्यांच्या उच्च पदांवर भारतीयांचा दबदबा आहे. आता या यादीत आणखी एका भारतीय महिलेचे, सोनिया स्यंगल हे नाव जोडले गेले आहे. सोनिया स्यंगल यांची अमेरिकेतील सुप्रसिद्ध कंपनी गॅप इंकच्या सीइओ पदी नियुक्त करण्यात आली आहे.


४९ वर्षीय स्यंगल फॉर्च्युनच्या ५०० जणांच्या यादीतील पहिल्या आणि एकमेव भारतीय-अमेरिका महिला सीईओ आहेत. त्यांच्या आधी या यादीत पेप्सिकोच्या सीईओ म्हणून इंदिरा नूयी यांचे नाव होते.


भारतात जन्मलेल्या सोनिया स्यंगल यांचे कुटुंब सुरूवातीपासूनच कॅनडा आणि त्यानंतर अमेरिकेत स्थायी झाले. त्यांनी १९९३मध्ये कॅटरिंग यूनिवर्सिटीमधून मॅकनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली घेतली. त्यानंतर १९९५ला स्टँडफर्ड यूनिवर्सिटीमधून मॅन्यूफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.


सोनिया यांनी आधी मायक्रोसिस्टम्स आणि फोर्ड मोटरमध्ये काम केले आहे. २००४मध्ये त्या गॅपला रुजू झाल्या. त्यांनी कंपनीच्या ‘ग्लोबल सप्लाय चेन’ आणि ‘प्रोडक्ट टू मार्केट मॉडेल’चे नेतृत्व केले होते व त्या यूरोप झोनच्या एमडी देखील होत्या.


सोनिया यांच्या नियुक्तीआधी कंपनीच्या सीईओपदाची धुरा गॅपच्या संस्थापकांचे सुपुत्र रॉबर्ट फिशर यांच्याकडे होती. १८ अब्ज डॉलर भांडवल असणारी ही कंपनी फॉर्च्युन ५०० यादीत १८६व्या स्थानी आहे. कंपनीत १ लाख ३५ हजार कर्मचारी काम करतात. अमेरिकेसह कंपनीचे जगभरात ३७२७ शाखा आहेत.


@@AUTHORINFO_V1@@