भारतीय महिला क्रिकेट संघाला विजयासाठी सचिनचा कानमंत्र

    06-Mar-2020
Total Views |

sachin tendulkar_1 &


मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारतीय संघाचा चार वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मुकाबला होणार आहे. भारतीय संघाने फायनलमध्ये विजय मिळवल्यास ते त्यांचे पहिले टी-२० विजेतेपद ठरले. इंग्लंडविरुद्धचा उपांत्य फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताला अधिक गुणांच्या आधारावर अंतिम फेरीचे तिकिट मिळाले. येत्या ८ मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. अंतिम सामन्यासाठी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या भारतीय महिला संघाला यशाचा कानमंत्र दिला आहे.



'तुम्हाला फक्त तो क्षण जगायचा आहे आणि फायनलवर लक्ष्य केंद्रीत करायचे आहे. मी ऑस्ट्रेलियात असताना टी-२० चषकाच्या शेजारी उभा होतो आणि भारतीय महिला संघातील काही खेळाडू माझ्यासोबत होत्या. तुम्ही या चषकासोबत भारतात आल्यास छान वाटेल. तुम्ही मैदानात जा आणि सर्वोत्तम कामगिरी करा. कोणत्याही प्रकारचा दबाव घेऊ नका. सध्या बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याची गरज नाही', असे सचिनने एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.