येस बँकेवर आरबीआयच्या निर्बंधांमुळे शेअर बाजारात भूकंप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2020
Total Views |

Yes Bank_1  H x
 
 
 
मुंबई : शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडताच शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १४ हजार अंशांनी कोसळला. तर, निफ्टीही ११ हजारांच्या खाली उघडला. २०२० वर्षातील आतापर्यंतच्या सर्वांत कमी अंशांवर बाजार उघडला, तेव्हा येस बँकेचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरलेले होते. सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी सेंसेक्स १,२८१.८५ अंशांनी किंवा ३.३३ टक्के घसरून ३७१८८.७६वर आला. तसेच, निफ्टी ३८६.३० अंशांनी किंवा ३.४३ टक्के घसरून १०८८२.७० वर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याबरोबरच रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ६५ पैशांनी घसरला आहे. आता एका डॉलरसाठी ७३.९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
 
 
येस बँकांवर लावले आरबीआयने निर्बंध
 
 
आर्थिक पत ढासळल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ‘येस’ बँकेवर निर्बंध घालण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. आरबीआयच्या निर्बंधानुसार खातेदारांना आता ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. ५० हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागेल. यासोबतच येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णयही बँकेने घेतला असून एसबीआयचे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. “खातेदारांनी घाबरू नये,” असे आवाहन आरबीआयने केले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@