देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ वर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2020
Total Views |
corona_1  H x W


नवी दिल्ली :
चीनसह जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या भारतात आता ३१ झाली आहे. दिल्लीतील उत्तम नगर परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. दरम्यान, केंद्र सरकारचे परिस्थितीकडे बारकाईन लक्ष असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.


देशात कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या गुरूवारपर्यंत ३० एवढी होती, गुरुवारी सायंकाळी गाझियाबाद ५७ वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आहे. त्यानंतर त्यास दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्याची पत्नी आणि मुलावर गाझियाबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी सकाळी दिल्लीतील उत्तम नगर परिसरातील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, तो नुकताच थायलंड – मलेशिया येथून भारतात परतला आहे. त्यामुळे देशात कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या आता ३१ झाली असून हा आकडा वाढण्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करीत आहेत.


संशयित अन्य २३ जणांचे नमूने पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट येथे पाठविण्यात आले आहेत, प्राथमिक तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आहे. अंतिम चाचणीतही तेच आढळून आल्यास देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५० च्या वर जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, केंद्र सरकार सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत असून असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत त्यावर लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे मास्क आणि हँड सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री होत असल्याचेही समोर आहे. त्यावर चढ्या दराने मास्कची विक्री केल्यास कारवाई करण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.


@@AUTHORINFO_V1@@